Thursday, February 25, 2021
Home Tech News १ अ‍ॅप सगळ्यांवर भारी

१ अ‍ॅप सगळ्यांवर भारी

बीपर एक सब्सक्रिप्शन बेस्ड सर्व्हिस आहे. ज्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला दर महिने १० डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांनुसार ७३० रुपये द्यावे लागणार आहेत. याच्या माध्यमातून तुम्ही सर्व अ‍ॅप्स एकाच प्लॅटफॉर्मवर वापरु शकता. बीपरवर तुम्ही १५ चॅटिंग सर्व्हिसचा सपोर्ट घेऊ शकता. यामध्ये अँड्रॉईड मेसेज एसएमएस, द बीपर नेटवर्क, डीस्कोर्ड, गुगल हंगआउट्स, Apple iMessage, इंस्ताग्राम, आयआरसी, Matrix, फेसबूक मेसेंजर, सिग्नल, Skype, Slack, टेलिग्राम, ट्वीटर आणि व्हॉट्सअ‍ॅप आहे. हे सर्व अ‍ॅप्स आपल्या मेसेजला एक लोकेशनवर फीड करते आणि युझर बीपरमध्ये याचे रिप्लाय देऊ शकता. त्याशिवाय, बीपरनुसार  ते दर आठवड्याला एक नवीन चॅटिंग प्लॅटफॉर्म जोडेल. बीपरला ओपन सोर्स मॅट्रिक्स मेसेजिंग प्लॅटफॉर्म अंतर्गत डेव्हलप करण्यात आलं आहे आणि पहिले याला नोव्हाचाट  च्या नावाने ओळखलं जात होतं. तुम्ही बीपरवर या लिंकच्या माध्यमातून साईन अप करु शकता. त्यानंतर तुम्हाला जॉईन होण्यासाठी इन्व्हिटेशन मिळेल.

हल्ली प्रत्येकजण एक पेक्षा अधिक मेसेजिंग अ‍ॅपचा वापर करत आहे. अशात अनेकदा वेगवेगळ्या अ‍ॅपवर मेसेज येत असल्याने ते सर्व मेसेज वाचणं शक्य होत नाही. पण, आता तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागणार नाही. फक्त एका अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही १५ पेक्षा जास्त चॅटिंग प्लॅटफॉर्म एकाच ठिकाणी रिप्लाय देऊ शकता. या अ‍ॅप्लीकेशनचं नाव बीपर आहे. याच्या माध्यमातून तुम्ही मेसेजिंग अ‍ॅप्सला एका ठिकाणी मॅनेज करु शकता. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही १५ चॅटिंग प्लॅटफॉर्मला एकाच ठिकाणी मॅनेज करु शकता. हे एक सेंट्रल हबप्रमाणे काम करते आणि यामध्ये तुम्हाला फेसबुक मेसेंजर सिग्नल, ट्विटर, टेलीग्राम, व्हॉट्सअ‍ॅप सारखे अनेक चॅट अ‍ॅप्स मिळत आहेत. याची सर्वात खास बाब म्हणजे हे अ‍ॅपल च्या iMessage ला अँड्रॉईड, लिनक्स आणि विंडोजवर उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी वेगवेगळी अ‍ॅप्स ओपन करून त्यात जाऊन मेसेजेस वाचण्याची आणि प्रत्येकावर वेगळा रेप्ली करण्याची गरजच पडणार नाही. या अ‍ॅप्सच्या मदतीनं तुम्हाला १५ पेक्षा अधिक मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स एकाच ठिकाणी ठेवता येणार आहेत. त्यामुळे वेळ सुद्धा मोठ्या प्रमाणत वाचणार आहे. नक्कीच बीपर ग्राहकांच्या पसंतीस उतरेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments