Friday, February 26, 2021
Home Tech News बीएसएनएलचे प्रीपेड आणि ब्रॉडबँडचे नवीन प्लान्स जाहीर

बीएसएनएलचे प्रीपेड आणि ब्रॉडबँडचे नवीन प्लान्स जाहीर

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या युजर्संसाठी एक नवीन प्लान लाँच केला आहे. १९९ रुपयांच्या या प्लानमध्ये कंपनी रोज डेटासोबत फ्री कॉलिंग आणि फ्री एसएमएस सुद्धा देत आहे. कंपनीने या प्लानला पीव्ही १८६ ज्या जागी लाँच केले आहे. १९९ रुपयांच्या पीव्ही १८६ च्या तुलनेत दोन दिवसांची जास्त वैधता दिली आहे. तसेच बीएसएनएलने आपल्या ९९८ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारा डेली डेटा वाढवला आहे. ३० दिवसांच्या वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी रोज २ जीबी डेटा ऑफर करीत आहे. १०० फ्री एसएमएस सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये कॉलिंग साठी रोज २५० मिनिट मिळतात. कंपनीचा हा नवीन प्लान २४ डिसेंबर पासून सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. कंपनीचा पीव्ही १८६ प्लान आता बंद करण्यात आला आहे. २८ दिवसांची वैधता आणि २ जीबी डेली डेटा देणाऱ्या या प्लानला १ जानेवारी पासून बंद करण्यात येणार आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० फ्री एसएमएस सोबत येत होता.

त्याचप्रमाणे बीएसएनएलने हाय स्पीड डेटा देण्यासाठी आपल्या भारत फायबर ब्रॉडबँड प्लानमध्ये काही बदल केले आहेत. कंपनीने आपल्या फायबर ग्राहकांसाठी पॅन इंडिया आधारित ४ TB पर्यंत २००Mbps ची स्पीड दिली जाणार आहे. बीएसएनएलने फाइबर-टू-द-होम च्या चेन्नई सर्कलमधील ग्राहकांसाठी ही स्कीम आणली आहे. त्यामुळे बीएसएनएल आपल्याया लेटेस्ट अपडेट द्वारे प्रायवेट इंटरनेट सर्विस प्रोवाइडर्सच्या ग्राहकांना आकर्षित करू शकते. तसेच खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएल कंपनी आपल्या ब्रॉडबँड प्लानसोबत Disney+ Hot star Premium चे फ्री अॅक्सेस देणार आहे. कंपनीच्या वेबसाइटवर भारत फायबर ब्रॉडबँड प्लानची महिन्याची किंमत ४९९ रुपये आहे. यात युजर्संना ५० Mbps  हाय स्पीड डेटा मिळणार आहे. याआधी युजर्संना १०० जीबी पर्यंत २० Mbps ची स्पीड मिळत होती. ३०० जीबी भारत फायबर ब्रॉडबँड प्लानची मासिक किंमत ७७९ रुपये आहे. ज्यात युजर्संना ३०० जीबी पर्यंत १०० Mbps ची स्पीड मिळणार आहे. आधी ही स्पीड ५० Mbps मिळत होती. तसेच याशिवाय ३०० जीबी संपल्यानंतर याची इंटरनेट स्पीड कमी होऊन ती २ Mbps ऐवजी आता ५ Mbps मिळणार आहे. बीएसएनएल ने ६०० GB CUL  भारत फायबर प्लान मध्ये सु्द्धा संशोधन केले आहे. आता ५० Mbps स्पीड ऐवजी १०० Mbps पर्यंत स्पीड देणार आहे. तसेच ६०० जीबी संपल्यानंतर इंटरनेट स्पीड २ Mbps ऐवजी १० Mbps करण्यात आला आहे. या प्लानसाठी महिन्याला ८४९ रुपये मोजावे लागणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments