Monday, March 1, 2021
Home India News कोविड लसीकरणासाठी CoWIN अ‍ॅप महत्वाचे

कोविड लसीकरणासाठी CoWIN अ‍ॅप महत्वाचे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना वॅक्सिन वितरण, डेटा ठेवण्यासाठी आणि लोकांना वॅक्सिनसाठी रजिस्टर करण्यासाठी कोविन  नावाचं एक अ‍ॅप बनवलं आहे. देशाचे नागरिक जे सेल्फ वर्कर्स नाहीत, ते वॅक्सिनसाठी CoWIN अ‍ॅपवर सेल्फ-रजिस्टर करू शकतात. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल प्ले स्टोअरवर डाउनलोड करावं लागेल. लस देण्यास सुरुवात केल्यानंतर, जे लोक अ‍ॅपवर आधीपासून रजिस्टर असतील त्यांना लवकरात लवकर वॅक्सिन मिळेल. २ जानेवारीपासून भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शनिवारपासून कोरोना वॅक्सिनचं ड्राय रन सुरू करण्यात आलं आहे. नक्की कसे आहे CoWIN अ‍ॅप आणि त्याच्या बद्दल माहिती थोडक्यात जाणून घेऊया.

CoWIN (COVID-19 Vaccine Intelligence Network), eVIN चं अपग्रेडेड वर्जन आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर फ्री असणार आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की,  पालिकेने पाच टप्प्यांत लसीकरण करण्याचे ठरविले असून त्यातील पहिल्या टप्प्यात सव्वा लाख डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. लसीकरण यशस्वी होण्यासाठी पालिकेने गेल्या १४ दिवसांत ७६२ मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले. तर, या प्रशिक्षकांनी आतापर्यंत २,५०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. राज्य सरकार या लोकांचा डेटा मिळवण्याचं काम करत आहेत. तिसऱ्या टप्प्यात गंभीर आजारांनी पीडित असलेल्या लोकांना लस देण्यात येईल. त्यासाठी CoWIN  अ‍ॅपद्वारे एक सेल्फ रजिस्ट्रेशन प्रोसेसची आवश्यकता आहे.

COVID -१९ वॅक्सिन ट्रॅकिंग आणि रजिस्ट्रेशन निश्चित करण्यासाठी CoWIN अ‍ॅपला ५ मॉड्यूलमध्ये विभागण्यात आले आहे. ज्यात पहिले प्रशासनिक मॉड्यूल, दुसरे रजिस्ट्रेशन मॉड्यूल, तिसरे वॅक्सिनेशन मॉड्यूल, चौथे लाभान्वित स्वीकृती मॉड्यूल आणि पाचवे रिपोर्ट मॉड्यूल आहे. जे लोक लसीकरण करू इच्छितात, त्यांना रजिस्ट्रेशन मॉड्यूल अंतर्गत संपूर्ण माहिती द्यावी लागेल. वॅक्सिनेशन मॉड्यूलमध्ये त्यांचा तपशील पडताळला जाईल आणि लाभान्वित स्वीकृती मॉडेल त्यांच्या लसीकरणाबाबत त्यांना एक प्रमाणपत्र पाठवेल. जे नागरिक आरोग्य कर्मचारी नाही, ते CoWIN अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन मॉड्यूलच्या माध्यमातून वॅक्सिनसाठी रजिस्टर करू शकतील. CoWIN अ‍ॅप अद्याप लाँच झालेलं नाही. CoWIN वेबसाईटवर सेल्फ रजिस्ट्रेशनसाठी १२ फोटो आयडेंटिटी डॉक्यूमेंट्स मतदान कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट आणि पेन्शन कागदपत्रे पैकी कोणत्याही एकाची गरज असेल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन नंतर, रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक SMS येईल, ज्यात मिळालेली तारीख, वॅक्सिनेशनची वेळ आणि ठिकाण दिले जाईल. अशा प्रकारची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया कार्यान्वित केली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments