Sunday, February 28, 2021
Home Tech News एक्सायटेलने जाहीर केले ब्रॉडबँड कनेक्शन वर जबरदस्त ऑफर प्लान्स

एक्सायटेलने जाहीर केले ब्रॉडबँड कनेक्शन वर जबरदस्त ऑफर प्लान्स

इंटरनेट कनेक्शन आणि इंटरनेट स्पीड यांमध्ये सर्व प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये कायम चढाओढ सुरु असते. त्यातीलच एक प्रसिद्ध कंपनी एक्सायटेल ने ग्राहकांसाठी नवीन घोषणा केली आहे. ज्यात ३ महिने, ६ महिने किंवा अन्य कोणत्याही अवधीसाठी फायबर प्लान युजर्स केवळ ५० रुपये अतिरिक्त देवून आपली स्पीड डबल करू शकतात. एक्सायटेलचे हे अनलिमिटेड फायबर प्लान ३९९ रुपये, महिना १०० एमबीपीएस, ४४९ रुपये महिना २०० एमबीपीएस आणि ४९९ रुपये महिना ३०० एमबीपीएस असे आहेत.

एक्साइटेल च्या फायबर प्लान युजर्सला जर केवळ एका महिन्यासाठी अनलिमिटेड इंटरनेट फायबर प्लान घ्यायचा असेल तर त्यांना १०० एमबीपीएस साठी ६९९ रुपये, २०० एमबीपीएस स्पीडच्या अनलिमिटेडसाठी ७९९ रुपये आणि ३०० एमबीपीएस अनलिमिटेड डेटासाठी ८९९ रुपये प्रति महिना द्यावा लागेल. तर युजर ३ महिन्याचा एक्साइटेल फायबर प्लान घेत असल्यास त्यांना १०० एमबीपीएस स्पीड साठी ५६५ रुपये, २०० एमबीपीएस अनलिमिटेड डेटा साठी ६३८ रुपये आणि ३०० एमबीपीएस स्पीड साठी ७३२ रुपये दर महिन्याला द्यावे लागतील.

त्याचप्रमाणे या कनेक्शन मुळे मिळणारे लाभ थोडक्यात पाहू. एक्साइटेल फायबर युजर जर ४ महिन्याचा प्लान घेत असेल तर त्यांना १०० एमबीपीएस साठी ५०८ रुपये, २०० एमबीपीएस साठी ५७२ रुपये आणि ३०० एमबीपीएस  स्पीड साठी ६३६ रुपये मोजावे लागणार आहेत. तर ६ महिन्यांच्या प्लानमध्ये युजर्संना १००  एमबीपीएस  स्पीड साठी ४९० रुपये, २०० एमबीपीएस  स्पीड साठी ५४५ रुपये आणि ३०० एमबीपीएस स्पीड साठी ६०० रुपये द्यावे लागतील. ९ महिन्याच्या प्लानसाठी युजरला १०० एमबीपीएस स्पीड साठी ४२४ रुपये, २०० एमबीपीएस स्पीड साठी ४७१ रुपये आणि ३०० एमबीपीएस स्पीड साठी ५३३ रुपये प्रत्येक महिन्याला द्यावे लागतील.

एक्साइटेल ब्रॉडबँड युजरने जर एकाच वेळी वर्षभराचा फायबर प्लान घेत असेल तर त्यांना १०० एमबीपीएस  स्पीड साठी दर महिन्याला केवळ ३९९ रुपये, २०० एमबीपीएस  स्पीडसाठी ४४९ रुपये आणि ३०० एमबीपीएस  स्पीड साठी केवळ ४९९ रुपये दर महिन्याला मोजावे लागतील. म्हणजेच प्रत्येक महिन्याला ५० रुपये जास्त देवून युजर आपली इंटरनेट स्पीड दुप्पट करून घेऊन लाभ करून घेऊ शकतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments