Sunday, February 28, 2021
Home Tech News अक्षय कुमारचा FAU-G गेम २६ जानेवारीला होणार लॉन्च

अक्षय कुमारचा FAU-G गेम २६ जानेवारीला होणार लॉन्च

अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी या गेमची घोषणा केली होती. त्यावेळी अक्षय कुमारने म्हटलं होतं की, “पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर अभियानाला पाठिंबा म्हणून हा अॅक्शन गेम सादर करताना मला अतिशय अभिमान वाटत आहे. निडर आणि एकतेचं प्रतिक गार्ड्स FAU-G गेम. मनोरंजनातून खेळाडूंना आपल्या सैनिकांचा त्याग समजण्यास मदत होईल. या मोबाईल गेममधून मिळणाऱ्या महसुलाचा २०% वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान केला जाणार आहे.

लोकप्रिय मोबाईल गेम PUBG भारतात बॅन केल्यानंतर पब्जी प्रेमींमध्ये निराशा पसरली होती. परंतु पब्जी सारखाच भारतीय गेम FAU-G ची घोषणा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने केली. तेव्हापासूनच तरुण या गेमची आतुरतेनं वाट पाहत आहेत. परंतु, आता लवकरच प्रतिक्षा संपणार असून, पूर्णपणे भारतीय असलेला FAU-G गेम प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. यामुळे तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. या गेमचा ट्रेलरही लॉन्च करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये पंजाबीमध्ये डॉयलॉग्स ऐकायला मिळतात.

गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर केंद्र सरकारने २९ जून रोजी ५९ चिनी अॅप्स, २७ जुलै रोजी ४७ अॅप्स आणि २ सप्टेंबरला ११८ अॅप्स बॅन केले होते. यामध्ये पब्जी, टिकटॉकसारख्या अॅप्सचा समावेश आहे. आत्ता FAU-G गेमच्या प्री-रजिस्ट्रेशनसाठीही सुरुवात झाली होती. ज्यामध्ये चाहत्यांचा खास उत्साह पाहायला मिळाला होता. सुरुवातीला २४ तासांमध्ये लाखो लोकांनी गेमसाठी रजिस्ट्रेशन केले.

अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाउंटवर या गेमचा एंथम जारी केलं आहे. त्याचसोबत त्याने गेमच्या प्री-रजिस्ट्रेशन लिंकही फॅन्ससोबत शेअर केली आहे. या लिंकमार्फत यूजर्स गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन करु शकतात. गेमच्या प्री-रजिस्ट्रेशनची सुरुवात झाली आहे. प्रमोटर्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मिलियनहून अधिक लोकांनी प्री-रजिस्ट्रेशन केलं आहे. प्री-रजिस्ट्रेशनची प्रक्रिया गूगल प्ले-स्टोअरवर करण्यात येत आहे. FAU-G गेम २६ जानेवारी रोजी डाऊनलोड करण्यात येणार आहे. अॅन्ड्रॉईड युजर्स हा गेम प्ले स्टोअरवरुन सहज डाऊनलोड करु शकणार आहेत. तसेच अॅपल युजर्ससाठी हा गेम कधी उपलब्ध होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. FAU-G गेममधील आणखी एक खास गोष्ट म्हणजे, या गेममध्ये एक भाग भारत-चीन लगतच्या गलवान खोऱ्याचा आहे. युजर्स भारताच्या सीमांवर तैनात होऊन शत्रुला सडेतोड उत्तर देऊ शकणार आहेत. पाहूया अक्षयचा FAU-G कशाप्रकारे पताका फळकावतो !

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments