Monday, March 1, 2021
Home Tech News फ्लिपकार्टमध्ये मराठी भाषेची लागली वर्णी

फ्लिपकार्टमध्ये मराठी भाषेची लागली वर्णी

फ्लिपकार्ट अॅप आता इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा सहा महत्त्वाच्या भाषा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. यामुळे भारतीय ग्राहकांसाठी ई कॉमर्स अधिक सहजपणे उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी फ्लिपकार्टने अधिक बळकट केली आहे. फ्लिपकार्ट या भारतातील बाजारपेठेने मराठी भाषा सादर करून आपल्या प्रादेशिक भाषेच्या सेवेला अधिक बळकटी दिली आहे. मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांची बोली भाषा आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. लाखो फ्लिपकार्ट वापरकर्त्यांना वैयक्तिक आणि बोली भाषेतील अनुभव देण्यासाठी ५४ लाखांहून अधिक शब्दांचे कंपनीमार्फत भाषांतर आणि लिपित लेखन करण्यात आले आहे. 

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने आपल्या अॅपवर आणि संकेतस्थळावर मराठीचा वापर करावा यासाठी मनसे आग्रही होते. परंतु अॅमेझॉनचं भांडण आता न्यायालयात गेले. ॲमेझॉनच्या ॲपमध्ये मराठी भाषा उपलब्ध करुन द्यावी यासाठी आधीही अनेकांनी मागणी केली होती. मात्र त्यांना ॲमेझॉनने प्रतिसाद दिलेला नाही. लाखो करोडो मराठी भाषिक ॲमेझॉन ॲपच्या माध्यमातून खरेदी करत असताना ॲमेझॉन या मागणीकडं दुर्लक्ष का करत आहे, असा सवाल मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर केला नाही तरी चालतो, तसा कोणताही कायदा नसल्याचा युक्तिवाद अॅमेझॉननं कोर्टात केलेला आहे. ॲमेझॉनला तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्यासाठी मनसेच्या कायदेतज्ञांची टीम पूर्णपणे कामाला लागलेली आहे. अॅमेझॉनची मुख्य स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टने मात्र या वादात न पडता मराठी भाषेचा स्वीकार केल्याचं दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर फ्लिपकार्ट कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देत मराठीत पोस्ट करत मराठीजनांना साद घातली आहे.

flipkart in marathi

फ्लिपकार्टने आज सकाळी ‘कस काय! असं ट्विट करत अंदाज लावा की अॅपमध्ये नवीन काय आहे? त्यामुळे समझदार को इशारा काफी हे याचा प्रत्यय सर्वांनाच आला. मनसे ने दोन्हीही ऑन लाईन शॉपिंग साइटला मराठी भाषेच्या स्वीकारासाठी काही दिवसांची मुदत दिली होती. परंतु या भाषेच्या वादात न पडता फ्लिपकार्टने मराठी भाषेचा अवलंब करून या पोस्टमधील फोटोमध्ये मराठी भाषेचा पर्याय दिसत आहे हे ट्वीट करून सांगितले. त्यामुळे विशेषतः सर्व मराठी माणसांकडून उस्फुर्तपणे या पोस्टवर कमेंट्स सह अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments