फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, गॅजेट्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि इतर गोष्टी ऑफर प्राईजमध्ये खरेदी करता येतात. पण आता कंपनी एका सेलमध्ये मोफत स्मार्टफोन खरेदीची संधी देत आहे. ही ऑफर १७ जानेवारीपासून सुरू झाली आहे. या ऑफर अंतर्गत फ्लिपकार्टवरुन फ्रीमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकतो.
फ्लिपकार्ट युजर्सला गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ स्मार्टपॅक ऑफर करेल. याचा कालावधी १२ महिने ते १८ महिनांपर्यंत असेल. या स्मार्टपॅकचं मासिक शुल्क ३९९ रुपयांपासून सुरू आहे. युजर नवा स्मार्टफोन खरेदी करताना, यापैकी एका स्मार्टपॅकची आपल्या आवडीनुसार निवड करू शकतात. स्मार्टपॅक खरेदी केल्यानंतर ग्राहकांना Sony LIVE, Zee5 Premium, Voot, Zomato Pro अशा सर्वीसही मिळतील. गोल्ड प्लॅनमध्ये १०० टक्के कॅशबॅक मिळेल. सिल्व्हर पॅकमध्ये ८० टक्के मनीबॅक मिळेल. तर ब्रॉन्झ पॅकमध्ये ग्राहकांना आपल्या स्मार्टफोनच्या खरेदीवर ६० टक्के पेसे परत मिळतील.
Stop wasting, switch to Flipkart Grocery for Triple Power Savings.
— Flipkart (@Flipkart) January 21, 2021
१७ जानेवारीपासून सुरू झालेल्या फ्लिपकार्ट स्मार्टपॅक प्रोग्रामअंतर्गत मोफत फोन खरेदी करण्याची संधी मिळत आहे. यात ग्राहक आपल्या आवडीचा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. फ्लिपकार्ट स्मार्टपॅक प्रोग्राम एक सब्सक्रिप्शन बेस्ड सर्व्हिस आहे. यासाठी युजरला स्मार्टफोन खरेदी करताना १२ महिने किंवा १८ महिन्यांचं सब्सक्रिप्शन खरेदी करावं लागेल. सब्सक्रिप्शनचा कालावधी संपल्यानंतर युजरला त्या स्मार्टफोनचा १०० टक्के कॅशबॅक मिळेल.
फ्लिपकार्ट प्लस सदस्य असलेल्या ग्राहकांना इतर ग्राहकांच्या तुलनेत जास्त बेनिफिट्स मिळणार आहे. प्राइम आणि प्लस सदस्यता घेण्यासाठी फ्लिपकार्ट अॅप्स डाउनलोड करुन प्रीमियम ग्राहकांना मिळणारे फायदे घेऊ शकतात. सदस्यत्व घेऊन तुम्ही समाधानी नसल्यास विक्री संपल्यानंतर आपण सदस्यता रद्द देखील करू शकता. ते फुकट आहे. फ्लिपकार्ट यांना माहित आहे की ग्राहक हे करतात. प्रीमियम सदस्यता वाढविण्याच्या उद्देशाने वापरकर्त्यांना हा पर्याय देण्यात आला आहे. कारण त्यातील बहुतेक फायदे मिळवल्यानंतर मेंबर राहयचं की नाही ते ठरवतात.