Friday, February 26, 2021
Home Tech News टाटा स्कायकडून ग्राहकांना गुड न्यूज

टाटा स्कायकडून ग्राहकांना गुड न्यूज

टाटा स्काय ने युजर्ससाठी TATA SKY REFER & EARN स्कीम सुरू केली आहे. या स्कीम अंतर्गत युजर्स आपल्या रेफरद्वारे मित्रमंडळींना टाटा स्काय कुटुंबासोबत जोडू शकतात. त्यात युजर्संना आणि त्यांच्या मित्रमंडळी दोघांनाही बक्षीस मिळू शकते. हे बक्षीस २०० रुपयांचे कॅशबॅक आहे. याशिवाय तुमच्या मित्रमंडळीना टाटा स्काय एचडी कनेक्सन वर स्पेशल डिस्काउंट ऑफर केला जात आहे. ही स्पर्धा ८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. याासाठी युजर्संना आपल्या टाटा स्काय अकाउंटला रिचार्ज करावे लागणार आहे. रिचार्ज पूर्ण केल्यनंतर काही सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील. त्यानंतर लकी ड्रॉ होणार आहे. त्यातील विजेत्याला कार जिंकण्याचीही संधी मिळणार आहे. यात युजर्संना ५०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे रिचार्ज करावे लागणार आहे.

टाटा स्कायच्या या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी या स्टेप्स समजून घ्याव्या लागतील. तसेच आपली संपूर्ण माहिती भरावी लागेल. यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट्सवर जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी द्यावे लागतील. यानंतर दुसऱ्या स्टेप्समध्ये तुम्हाला तुमच्या मित्र मंडळीचे नाव म्हणजेच ज्याला तुम्ही रेफर करू इच्छिता त्यांचे नाव, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, आणि ई-मेल आयडी द्यावा लागेल. तुम्ही तुमच्या मित्र मंडळीचे, जीमेल, फेसबुक, लिंकडिन यासारख्या अनेक मीडिया द्वारे टाटाच्या या स्कीमला रेफर करू शकता. याशिवाय टाटा स्काय HD सेट-टॉप बॉक्स आता कंपनीच्या अधिकृत साइटवर १४९९ रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. टाटा स्काय देशातील सर्वात मोठी DTH सर्विस प्रोवाइडर कंपनी असून, टाटा स्कायने भारतात न्यू कॉन्टेस्ट लाँच केले आहे. याला टाटा स्कायचे रिचार्ज केल्यानंतर कार जिंका कॉन्टेस्ट नावाने सुरू करण्यात आले होते. या स्पर्धेत ३० विजेत्यांना टियागो कार दिली जाणार आहे. या कारची सुरुवातीची किंमत ४.७० लाख रुपये आहे. पाहू या स्कीमला ग्राहकांचा किती प्रमाणात प्रतिसाद लाभतो. अशा प्रकारे टाटा स्कायने नवीन वर्षात कार जिंकण्याची एक सुवर्णसंधीच ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments