Sunday, March 7, 2021
Home Tech News गुगल आणि अॅमेझॉनला ठोठावला दंड

गुगल आणि अॅमेझॉनला ठोठावला दंड

फ्रान्समधील डेटा प्रायव्हसीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेकडून हा दंड ठोठावण्यात आलाय. यानुसार अॅमेझॉन आणि गुगला १६.३ कोटी डॉलर्सचा दंड भरावा लागणार आहे. डेटा प्रायव्हसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुगलवर १०० दशलक्ष युरो म्हणजेच १२ कोटी डॉलर्स तर अॅमेझॉनला ३५ दशलक्ष युरो म्हणजे ४ कोटींचा दंड लावला आहे. खरेदी विक्रीच्या वेब साईट, विविध आप्लिकेशन, समाज माध्यमे यांच्या कडून ग्राहकांच्या डेटाचा गैरवापर केला जातो. या डेटाचा विनापरवाना वापरून करून या साईट कोटींची कमाई करतात. कोरोना काळामध्ये ग्राहकांकडून या सर्व प्रकारच्या साईट चा वापर मोठ्या प्रमाणात वापर केला गेल्याने ग्राहकांची माहिती या साईट कडे आली आहे. मात्र या साईट चा वापर करण्यासाठी ग्राहकांनी आपली कोणती माहिती द्यावी हे बंधनकारक असल्याने या कंपन्या या माहितीचा गैर वापर करतात. याला आळा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारनेच यावर वेळोवेळी बंधन घालणे आवश्यक आहे. मात्र राजकीय पक्षांचा प्रभाव असल्याने या माहितीच गैरवापर केल्याचे प्रकारने नेहमीच समोर येतात. यामध्ये २०१६ मध्ये अमेरीकन अध्यक्षीय निवडणुकांमध्ये केम्ब्रिज अॅनालीटीका हे प्रकरण प्रचंड गाजले होते. यामुळे रशिया अमेरिका हा दोन महासत्तांचा वाद देखील पुन्हा उफाळून आला होता. CNIL च्या म्हणण्याप्रमाणे, गुगल आणि अॅमेझॉन कंपन्यांच्या फेन्च वेबसाईटने इंटरनेट युझर्सना ट्रॅकर किंवा कुकीजच्या बाबतीत मंजुरी मागितली नव्हती. या दोन्ही कंपन्यांनी काही काळापूर्वी वेबसाईट्स मध्ये बदल केले होते. परंतु हे बदल फ्रान्सच्या नियमांप्रमाणे योग्य नव्हते , असंही CNIL ने म्हटले आहे. गुगल आणि अॅमेझॉन याबद्दल कोणतीही माहिती देण्यास असमर्थ ठरले आहेत.. गुगलच्या प्रकरणात त्यांनी कुकीजद्वारे एकत्र केलेल्या डेटाटून जाहिरातीद्वारे कमवलेल्या उत्पन्नातून नफा मिळवला. याचा परिणाम तब्बल ५० दशलक्ष युझर्सवरही झाला, असंही कंपनीने सांगितले आहे.. त्यांना ठोठावण्यात आलेला दंड हा त्यांच्या नियमांच्या उल्लंघनाच्या तुलनेत योग्यचं आहे,  असे देखील या कंपनीनं म्हटलं आहे.

गुगल आणि अॅमेझॉनला या संस्थेनं तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. यामध्ये त्यांना आपली पद्धत बदलावी लागणार आहे. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या डेटाचा वापर कसा केला जातो आणि कुकीजना ते कसं नाकारू शकतात हेदेखील त्यांना स्पष्ट करावं लागणार आहे. असं न केल्यास त्यांना दररोज १ लाख युरोचा दंड भरावा लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments