Saturday, March 6, 2021
Home Tech News गुगल सेवा अचानक ठप्प

गुगल सेवा अचानक ठप्प

कोरोनाचा संसर्ग अजूनही कायम असल्याने सर्वत्र वर्क फ्रॉम होमच्या पर्यायाचा वापर केला जात आहे आणि घरून काम करत असताना गुगल च्या विविध सर्व्हिसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ऑफिसची कामे, मुलांचे ऑनलाईन क्लासेस इ. सगळ्यासाठीच इंटरनेटचा वापर केला जातो. आणि त्यात अचानक संध्याकाळी सर्व गुगल सेवाना एरर दिसून येत होता. साधारण पाऊण तास सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या. अगदी गुगल वरील Gmail आणि YouTube सर्विस युजर्सला वापरण्यास जगभरातून समस्या येत आहे. याबद्दल युजर्सकडून सोशल मीडियावरील ट्विटरवर तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, गुगल चॅट, हँगआउटसह अन्य सर्विस ज्या जी-मेलच्या माध्यमातून वापरल्या जातात त्यासाठी समस्या उद्भवत आहेत. जी-मेल ची सुविधा ठप्प झाल्याने प्रोफेशनल कामासह, गुगल चॅट आणि जीमेल वापरकर्त्यांना सद्यच्या घडीला माहिती किंवा एखादी फाइल शेअर करण्यासाठी समस्या येत आहे. कोरोना व्हायरच्या काळात या सारख्या सुविधांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. खासकरुन घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जीमेलसह अन्य सर्विसचा नेहमीच वापर केला जातो. युजर्सकडून यासंदर्भात जोक्स आणि उपहासात्मक पोस्ट करण्यात आल्या आहेत. तर जी-मेल, युट्युब सारख्या प्लॅटफॉर्मचा युजर्सकडून मोठ्या प्रमाणात दररोज वापर केला जातो.

जगभरातील गुगलची सेवा बाधित झाल्याचे दिसले आहे. सायंकाळी ५.२० वाजता गुगलची जीमेल सेवा आणि हँगआउट सह अनेक सेवामध्ये एरर पेज पाहायला मिळाले. अवघ्या काही सेकंदात ट्विटरवर #YouTubeDOWN आणि #googledown ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक जणांनी आपल्या जीमेलच्या एरर पेजचा स्क्रीन शॉट टाकायला सुरू केला आहे. यूट्यूब प्रमाणेच हँगआउट डाउन झाल्याने अनेकांनी आपली अडचणी सोशल मीडियावर मांडली आहे. जवळपास ४५ मिनिटे विस्कळीत झालेली सेवा ६.५ वाजता पूर्वपदावर आली. यूट्यूबवर सुद्धा ही समस्या उद्भवली आहे. तसेच गुगल सर्च इंजिन म्हणजेच google.com मात्र व्यवस्थित सुरू असल्याचे दिसत आहे. गुगलच्या या सेवेला कशामुळे फटका बसला याचे कारण, अद्याप समोर आले नाही. तुम्ही यूट्यूब उघडण्याचा प्रयत्न केला तर यूट्यूब उघडणार नाही. परंतु, जर विना लॉगिन यू्ट्यूब उघडला तर यूट्यूब चांगले काम करीत आहे. गुगलची सेवा केवळ भारतात बंद झाली नाही तर संपूर्ण जगभरातून या संबंधीची तक्रार येत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मध्ये सुद्धा अशीच समस्या येत आहे. याआधी २५ सप्टेंबर रोजी अमेरिकेत जीमेल सह गुगलची काही सेवा बाधित झाली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments