Friday, February 26, 2021
Home Tech News गुगलने गुगल ड्राईव्ह अप्लिकेशन मध्ये केला मोठा बदल

गुगलने गुगल ड्राईव्ह अप्लिकेशन मध्ये केला मोठा बदल

गुगल ड्राईव ही ऑनलाईन फाईल स्टोअरेज सर्विस आहे. हि फाईल साठवण्यासाठी गुगलने केलेली एक अप्लिकेशन आहे. तिची सुरुवात दिनांक २४ एप्रिल २०१२ ला करण्यात आली. हे अप्लिकेशन क्लाऊड कॉम्पुटीग तंत्रावर आधारित आहे. गुगल ड्राईव्ह अॅप्लिकेशनद्वारे तुम्ही कोणत्याही फाईल, फोल्डर, फोटो आणि व्हिडीओ ऑनलाईन सेव्ह करु शकतात. गुगल युझरला स्टोअरेजसाठी ५ जीबीपर्यंतचा मोफत स्पेस देतं. यानंतर गरज असेल तर युझरला गुगलकडून स्पेस खरेदी करावी लागते. तुम्ही जर डेटा स्टोअर करण्यासाठी गुगल ड्राईव्हचा वापर करत असाल तर लवकरच गुगलमध्ये तुम्हाला मोठा बदल दिसणार आहे.

आतापर्यंत तुम्ही संपूर्ण डेटा गुगल ड्राईव्हमध्ये स्टोअर करुन ठेवत असाल. याआधी एखादी फाईल डिलीट झाली तर ती गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह राहायची. पण आता गुगल ने ड्राईवच्या सेटिंग मध्ये काही प्रमाणात बदल घडवून आणले आहेत. आता मेल प्रमाणे गुगल ड्राईव्हमध्ये ट्रॅश म्हणजेच डिलीट केलेल्या फाईल फक्त ३० दिवसांपर्यंत सेव्ह राहतील. यानंतर गुगल या फाईल्स डिलीट करणार आहे. गुगलने एका ब्लॉगद्वारे ड्राईवच्या अपडेटबाबत माहिती दिली आहे. गुगलने म्हटलं आहे की, “आम्ही १३ ऑक्टोबर २०२० पासून रिटेन्शन पॉलिसीमध्ये बदल करत आहोत. यानुसार ट्रॅश फोल्डरमध्ये असलेल्या कोणत्याही फाईल 30 दिवसांनी आपोआप डिलीट होतील. ही पॉलिसी जी-सूट सोबत जीमेललाही लागू होईल.” आत्ता पर्यंत गूगल ड्राईव ट्रॅशमधील फाईल्स कायम सेव्ह राहायच्या, पण आता १३ ऑक्टोबरपासून असं होणार नाही आहे. आता फक्त ३० दिवसांपर्यंतच तुमचा डेटा सेव्ह राहणार असून त्यानंतर आपोआप गुगलही ड्राईवमधून तुमचा डेटा डिलीट करेल. गुगलच्या मते नव्या अपडेटचा फायदा युझर्सना होणार आहे. आता युझर्स केवळ त्याच फाईल्स डिलीट करतील ज्या त्यांना खरंच डिलीट करायच्या आहेत. आपल्या नव्या पॉलिसीबाबत गुगल एक बॅनरही युझर्सना दाखवेल, ज्यामुळे ते जागरुक होऊ शकतील. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी गुगल ड्राईवमध्ये मोठा बग सापडला होता, ज्यामुळे हॅकर ड्राईवचा चुकीचा वापर करु शकत होते. या बगद्वारे हॅकर्स तुमचा फोनही हॅक करु शकतात. परंतु गुगलने वेळीच हा बग फिक्स केला होता. त्यामुळे आपला डेटा सुरक्षित राहीला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments