Friday, February 26, 2021
Home Tech News सायबर गुन्हे रोखण्यासाठी गुगलचे पाउल, क्रोममध्ये केले नवे अपडेट

सायबर गुन्हे रोखण्यासाठी गुगलचे पाउल, क्रोममध्ये केले नवे अपडेट

सध्याच्या जगात नेटचा जास्त वापर आणि वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. इंटरनेटचा वापर करून सायबर गुन्हे नक्की घडवता येतात तरी कसे आणि त्यांचे स्वरूप कसे असते हे समजून घेणे मात्र अनेक जणांच्या विचारांच्या बाहेर असते. याचे मुख्य कारण म्हणजे अर्थातच त्यांना या संदर्भातली अगदी थोडकी माहिती असते आणि शिवाय या सगळ्या प्रकारांमधली गुंतागुंत इतकी क्लिष्ट असते की ती समजून घेणे सहजासहजी शक्य होत नाही. नेमक्या याच गोष्टीचा सायबर गुन्हेगार अनेकदा फायदा उठवतात. सतत इंटरनेट नव्याने वापरायला सुरुवात करणारी निष्पाप माणसे मात्र या प्रकाराला सतत बळी पडतात. या प्रकारात इंटरनेटवरचे भामटे सर्वसामान्य लोकांना भुलवून, घाबरवून किंवा फसवून त्यांचे नुकसान करतात. त्यासाठी ते आधी आपल्याला एक भुलवणारा ई-मेल पाठवतात. उदाहरणार्थ त्या ई-मेलमध्ये ‘तुमच्या इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड एका हल्लेखोराने मिळवला आहे, त्यामुळे निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी लगेच तुमचा पासवर्ड बदला, असे लिहिलेले असते. त्यासाठी या ई-मेलमध्ये एक लिंक दिलेली असते.

सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी गुगलने आपले क्रोम ब्राउजरमध्येही नवे अपडेट आणले आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये पासवर्ड प्रोटेक्शन जोडता येणार आहे. आपल्या यूजर्सच्या खाजगी डिटेल्स संबंधित कुठलीही छेडछाड होऊ नये यासाठी गुगलने हे पाऊल उचलले आहे. यासाठी गुगल क्रोमने आपले लेटेस्ट व्हर्जन v88 रोल आऊट केला आहे. डेस्कटॉप यूजर्सला आपल्या क्रोम ब्राउजरला अगदी सोप्या स्टेप्सनुसार अपडेट करावे लागेल. पाहूया कशी आहे प्रोसेस. यासाठी सर्वात आधी गुगल क्रोम रन होईल. ब्राउजर ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला अॅड्रेस बार जवळ तीन डॉट्स दिसतील त्यावर टॅप करा. त्यानंतर खालच्या दिशेला स्क्रोल करुन सेटिंग्स पर्यायावर क्लिक करा सेटिंग्स वर क्लिक केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला अनेक पर्याय दिसतील. यात तुम्हाला सेफ्टी चेक  वर क्लिक करावे लागेल. जसे तुम्ही सेफ्टी चेक  वर क्लिक करता, तसे वरच्या बाजूस तुम्हाला चेक नाऊ  चे निळे बटन दिसेल. त्या बटनावर क्लिक करुन तुम्हाला गुगल क्रोमचे लेटेस्ट अपडेट चेक करायला मिळेल. जर तुमचे ब्राउजर लेटेस्ट अपडेटसह आधीच अपडेट असेल तर तुम्हाला ते अपडेशन साठी सांगणार नाही. मात्र जर ते अपडेट नसेल तर तुम्हाला त्यावर टॅप करुन लेटेस्ट अपडेट डाऊनलोड करावे लागेल. या पद्धतीने गुगल क्रोमचे नवे v88 व्हर्जन सह तुम्हाला सिक्युरिटी पर्याय मिळेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments