Saturday, March 6, 2021
Home Tech News गुगल को सब पता है..

गुगल को सब पता है..

गुगल या नावाने हे प्रसिद्ध तंत्रज्ञान, अर्थात हे सर्च इंजिन असंख्य प्रश्नांची उत्तरे देते. कित्येक गोष्टींबाबतची माहिती देत तुमच्या आमच्या शंकांच निरसन करत असतं. त्यामुळं प्रश्न कोणताही असो, उत्तर देण्यासाठी गुगल आहे ना असं म्हणत आपण मात्र निर्धास्त असतो. गुगल नेमकी आपल्या प्रश्नांची उत्तरं कसं शोधतं ! गूगल वर कस सर्च कराव म्हणजे गूगल आपल्याला हवी असलेलीच माहिती देईल हे सुद्धा माहिती असणे महत्त्वाचे असते. गूगल वर सर्च करण्याच्या बाबतीत बऱ्याच जणांचा समज चुकीचा असतो. सुरुवातीला हे आपल्याला समजून घ्यायला हव की गूगल हे एक एप्लीकेशन आहे अर्थात एक निर्जीव गोष्ट आहे गूगल एखादी व्यक्ती नाही आहे की आपल्याला जी माहिती हवी आहे ते आपल्याकडून नीट समजून घेईल आणि नंतर आपल्याला हवी असलेली माहिती पुरवेल. गूगल तुम्ही दिलेल्या शब्दांवरुन तुम्हाला हवी असलेली गोष्ट सर्च करतो. तुम्ही दिलेल्या शब्दांमधुन तो आहे तसेच शब्द कोणत्या वेबसाइट वर आहेत हे शोधतो. आणि तो आपल्याला रिजल्ट देतो. आणि म्हणूनच जरी आपण काही सर्च करताना व्याकरण चुकला तरी तो चुकीचा रिजल्ट देत नाही. म्हणूनच आपल्याला काही सर्च करायचा असेल गूगल वर तर मोजके शब्द लिहिले तरी आपला काम होऊन जाते.

एखादा असा प्रश्न, ज्याचं उत्तर देण्यासाठी आपणही असमर्थ असतो त्यावेळी आधार घेतला जातो तो म्हणजे एका खात्रीशीर मदतीचा, तंत्रज्ञानाचा. कोणत्याही विषयाबाबत जेव्हा आपण गुगलवर जाऊन माहिती शोधतो, तेव्हा गुगल सर्वप्रथन वेब पेजवर माहिती उपलब्ध आहे का हे तपासते आणि त्या विषयाशी निगडीत सर्वाधिक सर्च केलेली माहिती उत्तरादाखल समोर लिंकच्या रुपात दाखवते. या प्रक्रियेला Crawling असं म्हणतात. क्रॉलिंगसाठी गुगल bot चा वापर केला जातो. ज्यामध्ये गुगल पेजेसना क्रॉ़ल करत नव्या पेज इंडेक्समध्ये जोडतं. गुगल bot हे एक वेब क्रॉलर्स सॉफ्टवेअर आहे. क्रॉलर्स एकमेकांकडून माहिती मिळवून ती गुगलच्या सर्व्हरपर्यंत आणतात. त्यामुळे कोणत्याही विषयाबद्दल उपलब्ध असलेली माहिती युजर्सना सहज उपलब्ध होते.  

Crawlers च्या माध्यमातून वेबपेज मिळण्यानंतर गुगल ची सिस्टीम वेगवेगळ्या पेजवरील माहिती तपासते. यामध्ये फोटो, व्हिडीओ आणि वेब कंटेंटचा समावेश असतो. क्रॉल केलेले पेज गुगल पडताळून पाहतं यामध्ये किवर्ड्स आणि वेबसाइट कंटेंटवर भर दिला जातो. याशिवाय वेबसाइट कंटेंटमध्ये कितपत नावीन्य आहे, माहिती क़ॉपी -पेस्ट तर नाही ना याचीही माहिती घेतली जाते. एक सारखाच कंटेंट असल्यास ती माहिती रद्द करण्यात येते. ही सर्व माहिती गुगल Index मध्ये साठवली जाते.

आपण गुगलवर कोणतीही माहिती शोधल्यास गुगल आपल्याला त्याच्याशी निगडीत प्रश्न आणि उत्तरही सुचवतं. यामध्ये सर्वात वर सर्च पेज रँक असते. या पूर्ण प्रक्रिये शिवायही गुगल आपल्या इंटरनल प्रोसेसरचीही मदत घेतो. ज्यानंतर गुगल तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी काही क्षणातच देते. तेंव्हा प्रत्येक युजर्सच्या मनात हेच येत असेल कि गुगल को सब पता है..

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments