Monday, March 1, 2021
Home Tech News काय आहे व्हिआयपी नंबरची भानगड ?

काय आहे व्हिआयपी नंबरची भानगड ?

व्हीआयपी नंबर हि गोष्ट अशी आहे कि काही लोक नंबर बघून आपला पुढील प्लान करतात. त्यात अगदी नवीन वाहन असेल, नवीन घर घ्यायचे असेल किंवा अगदी आपला रोजच्या वापरातील मोबाईल नंबर असेल. आणि अशा प्रकारचे नंबर मिळवण्यासाठी ही लोक जीवाचा आटापिटा करताना दिसतात. काही जण तर अगदी एखाद्या अंकाने सुद्धा नशीब पालटू शकते या विचारसरणीने ज्योतिष्य अंक शास्त्राचा वापर करून सुद्धा व्हिआयपी नंबर साठी आग्रही दिसतात. काही जणांना तर फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर हवा असतो. त्यांच्यासाठी ते वाट्टेल तितकी किंमत मोजायलाही मागेपुढे पाहत नाहीत. परंतु, व्हीआयपी आणि फॅन्सी नंबर कसा मिळवायचा हे अनेकांना माहिती नसते.

व्हीआयपी-फॅन्सी नंबरसाठी अर्ज केल्यास तुम्हाला तो मिळू शकतो. जाणून घेऊया कसा मिळवता येवू शकतो व्हीआयपी-फॅन्सी मोबाइल नंबर. फॅन्सी किंवा व्हिआयपी  नंबरसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी गुगलवर जावून BSNL Choice Number  सर्च करा. यानंतर एक सर्वात वरच्या दिलेल्या वेबसाइटवरील CYMN वर क्लिक करा. याला ओपन केल्यानंतर एक विंडो समोर दिसेल. ज्यात वेगवेगळ्या झोन प्रमाणे राज्य देण्यात आली आहेत. तुम्ही ज्या राज्यात राहता आहात त्याला सिलेक्ट करा. स्टेटवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. यात दिलेल्या स्लाइडरला स्लाइड करून पेजला अनलॉक करू शकता.  पेजच्या अनलॉक केल्यानंतर काही नंबर तुमच्या समोर दिसतील. यातील दोन नंबर दिले आहेत. एक साधे नंबर आणि दुसरे व्हीआयपी नंबर. आता तुम्हाला व्हीआयपी-फॅन्सी नंबरवर क्लिक करावे लागेल. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन टेबल दिसेल. यात एक किमतीच्या नावाचा ऑप्शन कॉस्ट दिला आहे. या नंबर्सला खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत, तसेच प्रत्येक नंबर्सच्या समोर किंमत लिहिलेली असते. यातील तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिजिट नंबर सर्च करु शकता. यासाठी एक कंटेन्स मध्ये जावून सर्च करू शकता. याशिवाय, तुम्ही सर्च बाय सीरीजच्या ऑप्शन अंतर्गत नंबर सर्च करू शकता. आता जो नंबर तुम्हाला खरेदी करायचा आहे. तो सिलेक्ट करा.

वर दिलेल्या रिझर्व नंबर ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. तसेच त्यानंतर एक डॉयलॉग बॉक्स ओपन होईल. आता यात तुम्हाला अॅक्टिव मोबाइल नंबर एन्टर करावे लागेल. नंबर टाकताच तुम्हाला तुमच्या फोनवर एक पिन येईल. तो तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल. इतके केल्यानंतर तुम्हाला व्हीआयपी नंबर रिझर्व होईल. रिझर्व केल्यानंतर Fill Application वर क्लिक करावे लागेल. यात तुम्ही तुमची सविस्तर माहिती सबमिट करून ओके करा. यानंतर जवळच्या कंपनीच्या जवळच्या आउटलेटवर जावून फॉर्म भरू शकता. मग तुम्हाला तुमचा मनपसंद नंबर मिळून जाईल. अशी सर्व आहे व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठीची प्रोसेस.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments