खाजगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीचे प्लान्स ऑफर केले आहेत. या प्लानध्ये डेटा कॉलिंग वेगवेगळी वैधता देण्यात आली आहे. जिओच्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. थोडक्यात जाणून घेऊया जिओ च्या काही प्रीपेड प्लान्स बद्दल माहिती.
भारतात वर्षाच्या सुरुवाती पासून लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर वाढला आहे. देशात लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक जण अजूनही वर्क फ्रॉम होम करीत आहेत. वर्क फ्रॉम होम करीत असल्याने डेटा जास्त खर्च करावा लागत आहे. देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी रिलायन्स जिओने २०२० मध्ये आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे रिचार्ज प्लान्स आणले आहेत. जिओकडून स्वस्त किंमतीतील प्लान युजर्संना दिले जात आहेत. जिओ अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा या प्लानवर देत नाही. नॉन जिओ नंबरवर कॉल करण्यासाठी युजर्संना ६ पैसे प्रति मिनिट आययूसी चार्ज द्यावा लागतो. ज्याच्या साठी कंपनी लिमिटेड कॉलिंग मिनिट्स ऑफर करीत आहेत.
रिलायन्स जिओचा हा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान आहे. १२९ रुपयांच्या या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता येते. यात युजर्संना २ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १००० नॉन जिओ मिनिट्स मिळते. तसेज जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन आणि ३०० एसएमएस मिळतात.
जिओचा १९९ रुपयांचा प्लान असून याची वैधता २८ दिवसांची आहे. यात ऑन-नेट कॉलिंगसाठी १ हजार मिनिट्स मिळतात. तसेच रोज १.५ जीबी डेटा आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
जिओचा ३९९ रुपयांचा प्लान असून जिओच्या या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. यात रोज १.५ जीबी डेटा फ्री ऑन-नेट कॉलिंग, ऑफ-नेट कॉलिंगसाठी २ हजार मिनिट्स मिळतात. रोज १०० एसएमएस मिळतात. युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
जिओचा ५५५ रुपयांचा प्लान असून वैधता ८४ दिवसांची आहे. यात युजर्संना फ्री ऑन-नेट कॉलिंग, ऑफ-नेट कॉलिंग साठी ३ हजार मिनिट्स मिळतात. रोज १०० एसएमएस आणि रोज १.५ जीबी डेटा मिळतो. यात जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.
जिओचा ७७७ रुपयांचा प्लान असून कंपनीच्या या प्लानमध्ये युजर्संना ८४ दिवसांची वैधता मिळते. ग्राहकांना फ्री ऑन-नेट कॉलिंग, ऑफ-नेट कॉलिंगसाठी ३ हजार मिनिट्स मिळतात. तसेच रोज १.५ जीबी हाय स्पीड डेटा आणि रोज १०० एसएमएस ची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये जिओ अॅप्सच्या कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन शिवाय यात एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार चे फ्री अॅक्सेस ग्राहकांना मिळते आहे.