Sunday, February 28, 2021
Home Tech News लावा कंपनीची स्वदेशी झेड सिरीज लॉन्च

लावा कंपनीची स्वदेशी झेड सिरीज लॉन्च

लावाने ग्राहकांच्या सुविधा ध्यानात ठेवून एमवायझेड स्मार्टफोन्सची सुविधा दिली आहे. यात तुम्ही तुमची मनपसंत डिझाइन व वैशिष्ट्ये सोबत कस्टमाइज करू शकतात. यात ६० हून जास्त ऑप्शन दिले आहेत. Lava Z Series च्या या स्मार्टफोन्स मध्ये Z2, Z4, Z6, आणि एमवायझेड स्मार्टफोन्सची विक्री ११ जानेवारी पासून ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोरवर सुरू होणार आहे. तर Lava Z1 आणि Z Up ची २६ जानेवारी पासून विक्री सुरू होणार आहे. लावा इंटरनॅशनलचे डायरेक्टर आणि बिजनेस हेड सुनील रैना यांनी बोलताना सांगितलं की, कस्टमायजेबल स्मार्टफोन सीरीज, ज्याचं ब्रँड नाव एमवायझेड आहे. हा कंपनीने स्वदेशी प्लांटमध्ये तयार केला  आहे.  लावाने भारतात Z Series अंतर्गत चार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मेड इन इंडियाचे फोन लेटेस्ट फिचर्ससोबत मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. याव्यतिरिक्त कंपनीने Lava Befit  Smart Band देखील लॉन्च केला आहे. कंपनीचा दावा आहे की,  Z Series चे सर्व स्मार्टफोन उत्तम फिचर्ससोबत लॉन्च केले आहेत.

lava mobiles

Lava Z Series मध्ये एन्ट्री स्मार्टफोन झेड वनमध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोन मध्ये octa-core MediaTek Helio A20 प्रोसेसर दिला आहे. ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरासोबत ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. लावाच्या या फोनमध्ये ३१००mAh ची बॅटरी दिली आहे.  लावा मोबाइल्सने भारतात Lava Z1 ला २ जीबी रॅम प्लस १६ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत ५ हजार ४९९ रुपये ठेवली आहे. Lava Z2 ला २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. Lava Z4 ला ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे.

Lava Z6 ला कंपनीने ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. यासोबच कंपनीने Lava Befit  Smart Band ला लाँच केले आहे. याची किंमत २ हजार ६९९ रुपये आहे. सुनील रैना यांनी पुढे बोलताना सांगितलं की, “जगातील हा पहिला कस्टमायजेबल स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना कॅमेरा, रॅम, रॉम आणि कलरचे ६६ कॉम्बिनेशन्स पैकी एक सिलेक्ट करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments