Friday, February 26, 2021
Home Tech News १०८MP कॅमेराचा पहिला मोबाइल !

१०८MP कॅमेराचा पहिला मोबाइल !

शाओमीचा Mi 10i या दशकातील सर्वात पहिला फोन आहे. ज्यात १०८MP कॅमेरा आणि ५G टेक्नोलॉजी दिली आहे. तसेच क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसर दिला आहे. Mi 10i साठी चाहत्यांनी आणि ग्राहकांनी दिलेल्या भरमसाठ प्रतिसादा बद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत. पहिल्या सेलमध्ये २०० कोटी रुपयांची विक्री ही एक मोठे यश आहे. त्यामुळे या ठिकाणी ही माहिती देताना आनंद होत आहे असे कंपनीने स्पष्ट केले. मी ब्रँडचा उद्देश आहे की, ग्राहकांना लेटेस्ट आणि बेस्ट टेक्नोलॉजी देणे.  शाओमीने हेही सांगितले की, अॅमेझॉन इंडियावर लाँचच्या नोटिफिकेशनसाठी १५ लाखांहून जास्त युजर्संनी रजिस्ट्रेशन केले होते. शाओमी मी १० आय ला देशात २० हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले होते. तर याच्या टॉप अँड मॉडलची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे.

 

शाओमीने आज भारतात आपल्या जबरदस्त हिट झालेल्या ‘मी सीरीज’ चा लौंच केला आहे. कंपनीने लेटेस्ट स्मार्टफोन शाओमी Mi 10i ५G भारतात लॉन्च केला आहे, ज्याची किंमत २०,९९९ रुपयांपासून सुरु होत आहे. शाओमी Mi 10i फक्त दिसायलाचं जबरदस्त आहे नाही तर या फोनची स्पेसिफिकेशन्स सुद्धा अद्ययावत आहेत आणि हा ५ जी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. सुरक्षेसाठी बॅक व फ्रंटला कॉर्निंग गोरिला ग्लास ५ दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ७५० जी प्रोसेसर दिला आहे. फोनला ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. हँडसेटला पॉवर बॅकअप देण्यासाठी यात ४८२० mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. क्वॉड रियर कॅमेऱ्यात १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो.  

शाओमी Mi 10i 5G भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट ६ जीबी रॅम सह ६४  जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ज्याची किंमत २०,९९९  रुपये आहे. तसेच फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये ६ जीबी रॅम सह १२८ जीबी स्टोरेज देण्यात आली आहे आणि या वेरिएंटची किंमत २१,९९९  रुपये आहे. शाओमी Mi 10i ५जी चा सर्वात मोठा वेरिएंट १२ जीबी रॅम सह १२८ जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत २३,९९९ रुपये इतके आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments