Friday, February 26, 2021
Home Tech News सर्वात स्वस्त 5G मोबाइलची भारतीय बाजारपेठेत धडक

सर्वात स्वस्त 5G मोबाइलची भारतीय बाजारपेठेत धडक

मोटोरोला कम्पनी भारतात Moto G 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी दोन फोन लाँच करणार आहे.  Moto G 5G आणि Moto G9 Power हे दोन फोन लाँच करणार असले तरी सध्या एकच फोन लाँच करणार असून मोटोरोला कंपनी आपला Moto G 5G लाँच करणार आहे. Moto G9 Power पुढील महिन्यात लाँच केले जावू शकते. भारतात Motorola Moto G 5G खूप स्वस्त आहे. काही दिवसांपूर्वी हा फोन यूरोपमध्ये लॉंच केला गेला. Motorola Moto G 5G यूरोपमध्ये २९९.९९ यूरोमध्ये म्हणजेच साधारण भारतीय २६,३०० रुपये मध्ये लॉंच केला गेला. तर भारतात याची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. यूरोपमध्ये व्होलकनो ग्रे, फ्रॉस्टेड सिल्वर रंगामध्ये उपलब्ध केला गेला आहे. दुपारी १२ वाजता Flipkart वर हा फोन लॉंच केला गेला. ७ डिसेंबरला याचा पहिला सेल सुरु होणार आहे. भारतात मोटोरोला Moto G 5G ची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. यासोबतच एचडीएफसी बॅंक कार्डवर तुम्हाला १ हजार रुपयांचे इंस्टंट डिस्काऊंट देखील मिळणार आहे. नव्या स्मार्फोनमध्ये मोटोरोला Qualcomm Snapdragon 750G  चा प्रोसेसर आहे. OnePlus Nord मध्ये देखील याप्रकारचा प्रोसेसर देण्यात आला आहे. Moto G 5G मध्ये इनबिल्ट स्टोरेज ६४ GB देण्यात आले आहे. मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून १ टीबी पर्यंत मोबाईलची मेमरी वाढवता येणार आहे

मोटोरोला Moto G 5G मध्ये असणारी काही वैशिष्ट्ये पाहूया. Moto G 5G या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. Moto G 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरे दिले आहे. या फोनमधील प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये वाइड अँगल लेन्स दिली आहे. याव्यतिरिक्त यामध्ये २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ५,००० mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये २० वॉटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट चार्ज दिले आहे. कनेक्टिविटीसाठी USB Type C पोर्ट दिले आहे.

आयफोन १२ लॉंच झाल्यानंतर 5G कनेक्टीव्हिटी स्पर्धा सुरु झालीय. नुकतेच OnePlus आणि Samsung देखील या सेगमेंटमधील फोन बाजारात आणण्याच्या स्पर्धेत आहेत. अशावेळी मोटोरोला देखील मागे नाहीय. कंपनी लवकरच आपला नवा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध करेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments