जगभरात चाललेल्या इंटरनेट कनेक्शन आणि त्याचा स्पीड बाबत कायम सर्व कंपन्यांची स्पर्धा सुरु असते. आणि त्यामध्ये आता ५ जी कनेक्टीव्हिटी साठी चढाओढ सुरु आहे. भारतात पुढच्या वर्षी म्हणजेच, २०२१ साली ५ जी सेवा लॉन्च करण्याची शक्यता असल्याची माहिती रिलायन्स जियोचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिली आहे.
दरम्यान, यासाठी काही बदल आणि वेगाने प्रक्रिया करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत ही प्रक्रिया सुलभ आणि स्वस्त केली जात नाही तोपर्यंत ती सर्वांपर्यंत पोहोचणं अशक्य आहे. ते म्हणाले की, भारताला ५ जी स्पेक्ट्रमबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत त्यांनी हेदेखील सांगितलं की, जियो ५ जी नेटवर्क सेवेचं नेतृत्त्व करणार आहे. भारतात येणाऱ्या काही दिवसांत सेमी कन्डक्टरचं मॅन्युफॅक्चरिंगचं केंद्र बनू शकतं. आम्ही सेमी कन्डक्टरसाठी केवळ बाहेरील देशांच्या मदतीवर अवलंबून राहू शकत नाही. देशात सध्या ३० करोड २ जी फोन युजर्स आहेत. या लोकांपर्यंत स्मार्टफोन अद्याप पोहोचलेला नाही आणि त्यासाठी त्यांनी धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. अंबानी म्हणाले की, आम्ही डिजिटल पद्धतीने खूप चांगले कनेक्ट झालो आहोत. तरिदेखील ३०० मिलियन लोक आताही २ जी स्मार्टफोनचा वापर करत आहेत.
मुकेश अंबानी पुढे म्हणतात की, २०२१ सालामध्ये जियो भारतात 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही ५ जी सर्विस पूर्णपणे स्वदेशी असून त्या व्यतिरिक्त हार्डवेअर आणि टेक्नॉलॉजीही स्वदेशी असणार आहे. जियोमार्फत आम्ही आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत. प्रमुख दूरसंचार कंपनी एरिक्सनच्या एका रिपोर्टनुसार, जगभरात २०२६ पर्यंत ३.५ अरब ५ जी कनेक्शन असतील, तर भारतात ५ जी कनेक्शनची संख्या ही जवळपास ३५ कोटी इतकी असेल. एरिक्सनचे नेटवर्क अधिकारी प्रमुख नितीन बंसल यांनी सांगितले की, जर स्पेक्ट्रमचा लिलाव पुढील वर्षाच्या सुरुवातीला झाला, तर भारताला त्याचं पहिलं ५ जी कनेक्शन २०२१ सालामध्येच मिळू शकतं. एरिक्सन मोबिलिटी रिपोर्ट – २०२० नंतर जगभरात एक अब्ज लोक असे असतील, जे जागतिक लोकसंख्येचा १५ टक्के हिस्सा असून त्यांची ५ जी कव्हरेजपर्यंत पोहोचलेली असण्याची शक्यता आहे.
२०२६ पर्यंत जगभरातील ६० टक्के लोकसंख्या ५ जी सेवेचा उपयोग करत असेळ. तसेच तोपर्यंत ५ जी ग्राहकांची संख्या वाढून ३.३ अब्जपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात ५ जी ग्राहकांची संख्या तोपर्यंत ३५ करोडचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. जी भारतातील एकूण मोबाईल वापरकर्त्यांच्या एकूण २७ टक्के इतकी आहे.