Monday, March 1, 2021
Home Tech News नोकिया स्मार्टफोन ७.३ लाँच

नोकिया स्मार्टफोन ७.३ लाँच

नोकियाचा नवीन स्मार्टफोन ५,०५० mAh बॅटरी सोबत येणार असून हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात मोठ्या बॅटरीचा फोन असणार आहे. या महिन्यात कंपनीने दोन बजेट स्मार्टफोन नोकिया ५.४ आणि नोकिया सी१ प्लस लाँच केले आहेत. दोन्ही फोनला सध्या यूरोपियन बाजारात लाँच केले आहेत. हे फोन भारतीय बाजारपेठेमध्ये कधीपर्यंत लाँच करण्यात येणार यासंबंधी कंपनीने अद्याप काहीही माहिती दिलेली नाही.

रिपोर्ट्सनुसार, नोकिया ७.३ स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९० प्रोसेसर मिळू शकतो. तसेच फोनला ५ जी कनेक्टिविटी देखील मिळेल. फोटोग्राफीसाठी यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. आणखी एक मॉडल Nokia 6.3 चा उल्लेख आहे. या फोनमध्ये ४,४७० mAh बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. नोकिया ६.३ स्मार्टफोनच्या रियरमध्ये २४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि दोन अन्य सेन्सर मिळू शकतो. नोकिया ७.३ आणि नोकिया ६.३ शिवाय कंपनी प्रीमियम फोन नोकिया १० सुद्धा लाँच करू शकते.

एचएमडी ग्लोबल लवकरच एक नवीन स्मार्टफोन Nokia ७.३ आणणार आहे. या फोनची अनेक दिवसांपासून उत्सूकता लागून राहिली आहे. आतापर्यंत या फोन संबंधी अनेक माहिती समोर आली. ती थोडक्यात पाहूया. नोकिया  ७.३ हा एक डयुअल सिम स्मार्ट फोन आहे. फोनमध्ये Qualcomm SM6350 Snapdragon 690 5G प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन 4 GB रॅमसह येतो. शिवाय फोनमध्ये 64 GB अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे. फोनमध्ये आपल्याला ५,०५० mAh  क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळत आहे. नोंकिया 7.3 मध्ये कनेक्टिव्हिटी पर्यायसुद्धा दिले गेले आहेत. जसे कि GPS, Wifi, HotSpot, NFC, Bluetooth. फोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ४८ + ८ +५ +२ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा आहे. नोकिया 7.3  चा कॅमेरा HDR, सारख्या उत्कृष्ट फीचर्ससह मिळत आहे. जर स्मार्टफोनच्या फ्रंट फेसिंग कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात आपल्याला २४ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरासुद्धा मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments