Thursday, February 25, 2021
Home Tech News वनप्लसचा सातवा अ‍ॅनिव्हर्सरी सेल ऑन

वनप्लसचा सातवा अ‍ॅनिव्हर्सरी सेल ऑन

वनप्लसच्या सातव्या अ‍ॅनिव्हर्सरी सेलमध्ये OnePlus Y सिरीजच्या टीव्हीवर डिस्काऊंट ऑफर करण्यात आला आहे. या मध्ये ३२ इंचाच्या आणि ४३ इंचाच्या टीव्हीवर १ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय HDFC बँकेच्या डेबिट, क्रेडिट कार्ड ईएमआयवर खरेदी केल्यास ४००० रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. कंपनी युजरला रेड केबल लाईफ ऑफर देत आहे. याद्वारे कोणत्याही वनप्लसच्या डिव्हाईसला अपग्रेड केल्यास त्यावर ३००० रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. प्रिमिअम स्मार्टफोन बनविणारी कंपनी OnePlus ला सात वर्षे झाली आहेत. यामुळे या कंपनीने धमाकेदार ‘7th Anniversary Sale’ आयोजित केला आहे. या सेलमध्ये कंपनी OnePlus 8 आणि OnePlus 8T सह दुसऱ्या प्रॉडक्ट्सवर देखील ऑफर देऊ करत आहे.

oneplus india

कंपनीने युजरसाठी इन्स्टंट डिस्काऊंट, नो कॉस्ट ईएमआय आणि कॅशबॅक सारख्या ऑफर देऊ केल्या आहेत. या सेलमध्ये एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे ट्रान्झेक्शन केल्यानंतर इन्स्टंट डिस्काऊंटचा फायदा मिळणार आहे. ग्राहकाना या सेलमध्ये HDFC Bank च्या कार्डद्वारे वनप्लस 8T खरेदी करत असेल तर त्याला २००० रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. तर HDFC Bank च्या कार्डद्वारे वनप्लस 8 सीरीज खरेदी केल्यास युजरला ३००० रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. इन्स्टंट म्हणजे खरेदीवेळी हे पैसे मूळ किंमतीतून वजा होणार आहेत. कंपनीने सांगितले की १७ आणि १८ डिसेंबरला Amazon आणि Flipkart वर ऑडिओ प्रॉडक्टवर १० टक्के सूट दिली जाणार आहे. कंपनी वनप्लस स्टोर अ‍ॅपवरून खरेदी केल्यास युजरला ५०० रुपयांचे डिस्काऊंट व्हाऊचर देत आहे. या अ‍ॅपवरून वनप्लसची पॉवर बँक खरेदी केल्यास युजरला सर्व ऑडिओ प्रॉडक्टवर १० टक्के सूट दिली जाणार आहे. आजच्या दिवशी वनप्लस एक्सपीरियंस स्टोअरवर जाणाऱ्या पहिल्या १० ग्राहकांना कंपनी 3 हजार रुपयांचे एक्सेसरीज कुपन देणार आहे. अशाप्रकारे ११ ते ३० नंबरच्या ग्राहकांना २००० रुपये आणि ३१ ते ७० नंबरच्या ग्राहकांना ५०० रुपयांचे कॉम्प्लिमेंटरी एक्सेसरीज कुपन दिले जाणार आहे.

भारत-चीन संघर्षादरम्यान, चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याबाबत सांगण्यात येत असताना,  अनेक संस्थांनीही चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावरही याबाबत मोठी चर्चा सुरु आहे. पाहू भारतात या सेलला किती प्रमाणात प्रतिसाद मिळतो !

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments