Monday, March 1, 2021
Home Tech News PM–WANI – तंत्रज्ञानात एक डीजीटल बदल

PM–WANI – तंत्रज्ञानात एक डीजीटल बदल

PM-WANI म्हणजे पंतप्रधान वाय-फाय अॅक्सेस नेटवर्क इंटरफेस. यामुळे देशभर वाय-फाय क्रांती होण्यास मदत होणार असून त्यामुळे प्रत्येकाला इंटरनेटची उपलब्धता होणार आहे असं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल सांगितले की, कॅबिनेटने देशभर PM-WiFi अॅक्सेस नेटवर्क इंटरफेस योजना लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात व्यापक स्वरुपात वाय-फाय नेटवर्क उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. भारतात डीजीटल क्रांती आणण्यासाठी केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत PM-WANI ही योजना देशभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं की, “पंतप्रधान वाय-फाय अंतर्गत पब्लिक डेटा अॅग्रीगेटर आणि अॅप प्रोव्हायडरना सात दिवसांच्या आत रजिस्ट्रेशन करावं लागेल. PM-WANI ही देशातील खूप मोठी क्रांती असेल. यामुळे देशातील प्रत्येक भागात इंटरनेटची उपलब्धता होण्यास मदत होणार आहे. यामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु असूनसुद्धा फक्त नेटवर्कच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहत होता. परंतु आता या सुविधेमुळे ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा सहजगत्या उपलब्ध होऊ शकते. विद्यार्थी आपली पुस्तके डाउनलोड करु शकतात. या योजनेमुळे कौशल्य विकासाचं काम सुलभ होण्यास मदत होईल, व्यापार आणि उद्योगधंद्यांचे काम सुलभ होण्यास मदत होईल. अशा प्रकारचे अनेक फायदे या योजनेमुळे होतील.

नक्की काय आहे हि योजना आणि त्यांची वैशिष्ट्ये याबद्दल थोडं जाणून घेऊया. PM-WANI योजनेत तीन मुख्य मुद्दे असतील. पहिला मुद्दा म्हणजे पब्लिक डेटा ऑफिस म्हणजे पीडीओ. या अंतर्गत देशभर १ कोटी पब्लिक डेटा ऑफिस सुरु करण्यात येण्याचा संकेत आहे. यासाठी रजिस्ट्रेशन किंवा लायसन्स फी आवश्यक नसेल. दुसरा मुद्दा हा पब्लिक डेटा अॅग्रीगेटर असेल. याद्वारे पब्लिक डेटा ऑफिसचे अकाउंटिंग आणि कार्यप्रणाली वर देखरेख ठेवली जाणार आहे. तिसरा मुद्दा हा अॅप प्रोव्हायडर हा असेल. या योजनेसाठी एक खास अॅप तयार करण्यात येणार आहे आणि युजर्सना ते डाउनलोड करावं लागेल. त्याचे एक डिजिटल ऑथेंटिकेशन असेल. सरकार याला अॅप स्टोअर सोबत आपल्या वेबसाईटवरही दाखवणार आहे. याच्या जाहिराती आणि लिंक सार्वजनिक करण्यात येतील. त्यानंतर नागरिक देशातील कोणत्याही पब्लिक डेटा ऑफिसमधून वाय-फाय अॅक्सेस करु शकतील. ही योजना भारतासाठी नक्कीच उपयुक्त ठरून डिजिटल बदलाचं मोठे माध्यम होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments