Saturday, March 6, 2021
Home Tech News भारतीय बाजारपेठेत सॅमसंगचे नवीन मोबाईल होणार लाँच

भारतीय बाजारपेठेत सॅमसंगचे नवीन मोबाईल होणार लाँच

भारतीय बाजारपेठेत सॅमसंग आपले नवीन स्मार्टफोन Galaxy M02 लाँच करणार आहे. तसेच कंपनी फेब्रुवारीत वेगवेगळ्या मार्केटमध्ये आणखी चार नवीन फोन लाँच करण्याची शक्यता आहे. लाँच करण्यात येणाऱ्या फोनमध्ये सॅमसंगची F सीरीजचे अनावरण होणार आहे. Galaxy F62, Galaxy F12, त्याचप्रमाणे, Galaxy A72 आणि Galaxy A52 5G या स्मार्टफोन्सचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे.

गॅलेक्सी F41 प्रमाणे गॅलेक्सी F12 आणि गॅलेक्सी F62 सुद्धा फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव फोन असणार आहे. त्यामुळे गॅलेक्सी F12 शी मिळता जुळता व्हेरियंट म्हणजेच गॅलेक्सी एम १२ अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. गॅलेक्सी F62 चे सपोर्ट पेज डिसेंबर २०२० मध्ये सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर लाइव्ह झाले आहेत. आता कंपनी गॅलेक्सी F62 चे सपोर्ट पेज लाइव केले आहे. सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एफ सीरीजला गेल्या वर्षी लाँच केले होते. या सीरीजचा पहिला स्मार्टफोन गॅलेक्सी F41 आहे. त्याचप्रमाणे, Galaxy M02 हा मागील वर्षी लाँच करण्यात आलेल्या Galaxy M01 स्मार्टफोनची अपडेट केलेली आवृत्ती असेल. जी कंपनी कमी किंमतीत आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह बाजारात लाँच करणार आहे. Samsung Galaxy M02 उद्या भारतात अर्थात अधिकृतपणे लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी त्याच्या किंमतीसंदर्भात आणि फिचर्ससंदर्भात काही माहिती समोर आली आहे. ती थोडक्यात पाहूया. Samsung Galaxy M02 स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले आहे. बॅटरी बॅकअपसाठी, यात ५००० mAh ची बॅटरी असेल. तथापि, अद्याप त्यातील अधिक वैशिष्ट्यांबद्दल माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु, लीक झालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर वर काम करेल. यात ३ जीबी रॅमसह ३२ जीबीचे अंतर्गत स्टोअरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. ज्यामध्ये १३ एमपी प्राइमरी सेन्सर असेल. यात सेल्फीसाठी ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये यूएसबी टाईप सी पोर्टही असण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियावर Samsung Galaxy M02 विक्रीसाठी उपलब्ध असेल. लॉन्च होण्यापूर्वी त्याची मायक्रो-साइट अ‍ॅमेझॉन इंडियावर प्रसिद्ध झाली आहे. अॅमेझॉनवर Samsung Galaxy M02 सह ६ ????? असं लिहिलं आहे. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, कंपनी हा स्मार्टफोन ७,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत बाजारात लाँच करू शकण्याची शक्यता वर्तवता येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments