व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे आणि यामुळे कंपनी वापरकर्त्याच्या डेटावर अधिक लक्ष ठेवण्यास सक्षम होईल. तसेच अट अशी आहे की जर वापरकर्त्यांनी ही नवीन पॉलिसी स्वीकारली नाही तर त्यांना स्वतःच अकाउंट डिलीट करावे लागेल. अशा परिस्थितीत जगभरातील लोक सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या इतर प्रायव्हसी फोकस्ड इन्स्टंट मेसेजिंग अॅप्सचा अवलंब करीत आहेत. सिग्नल हे एक असे अॅप आहे जो केवळ वापरकर्त्याच्या डेटाच्या नावावर लोकांकडून केवळ कॉन्टॅक्ट नंबर घेतो. जगभरातील पत्रकार, कार्यकर्ते, राजकारणी, वकील आणि सुरक्षा तज्ञ मोठ्या संख्येने याचा वापर करतात. व्हॉट्सअॅपने आता युझर्सचा डेटा एकत्र करण्यास सुरवात केली आहे तर सिग्नल अॅप कोणत्याही प्रकारे युझर्सचा डेटा संकलित करत नाही. सिग्नल अॅप हे केवळ युझर्सचा मोबाइल नंबर घेते, तर व्हॉट्सअॅप सर्व डेटा, फोन नंबर, कॉन्टॅक्ट लिस्ट, लोकेशन, मेसेज हा डाटा कलेक्ट एकत्रित करतो.
८ फेब्रुवारी २०२१ पासून, व्हॉट्सअॅप आपले नवीन गोपनीयता धोरण बदलणार आहे. याबद्दल काही लोक विरोध दर्शवित आहेत. त्याचबरोबर काही लोक असेही म्हणतात की व्हॉट्सअॅप नाही तर दुसरे कोणते अॅप वापरावे. असं कोणतं अॅप आहे, जे व्हॉट्सअॅप सारख्या सुविधा पुरवू शकते. त्यांच्या गरजा पूर्ण करेल आणि मुख्य म्हणजे ज्यात आपला डेटा चोरी होणार नाही, अशी खात्री असेल. आता लोकं प्रायव्हसी फोकस्ड इन्स्टंट मेसेजिंग अॅप सिग्नल ला व्हॉट्सअॅपसाठी पर्याय म्हणून उपयोग करत आहेत. आता हे अॅप भारतासह अनेक देशांमध्ये टॉप फ्री अॅप बनला आहे. फेसबुकने विकल्यानंतर व्हॉट्सअॅपचे सह-संस्थापक ब्रायन अॅक्टनने सिग्नल फाऊंडेशनची स्थापना केली. फेसबुक मेसेंजर प्रमाणेच हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप देखील जगातील सर्वात सुरक्षित मानले जाते. सिग्नल फाउंडेशन ही एक नॉन-प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन आहे आणि कोणत्याही मोठ्या टेक कंपनीशी भागीदारी नाही. या अॅपचा विकास सिग्नल वापरकर्त्यांच्या डोनेशन सपोर्टमधून होतो. सिग्नल मेसेंजर एलएलसी हा मोझिलासारख्या नॉन- प्रॉफिट संस्था सिग्नल फाऊंडेशन अंतर्गत काम करतो.
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले एलन मस्क यांनी ट्विट करुन आपल्या फॉलोअर्सना सिग्नल अॅप वापरण्याचा सल्ला दिला आहे. मस्कच्या या ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या ट्विटला २.७.लाखाहून अधिक लोकांनी लाईक्स केले असून ३२ हजारांहून अधिक जणांनी री-ट्वीट केले आहे. सिग्नलचे सर्वात जुने आणि उपयुक्त वैशिष्ट्य म्हणजे आपण मॅसेज डिसॅपियर करू शकता. व्हॉट्सअॅपवर हे फीचर नुकतेच आले आहे. वापरकर्ते यासाठी १० सेकंद ते आठवड्यापर्यंत एक टाइमर सेट करू शकतात. यापेक्षा जुने काहीही आपोआप नष्ट होईल. बघूया व्हॉट्सअॅपला सिग्नल रिप्लेस करू शकते का !