Friday, February 26, 2021
Home Tech News चीनला पुन्हा दणका, टाटा सन्स बनवणार मोबाईल्सचे पार्ट्स

चीनला पुन्हा दणका, टाटा सन्स बनवणार मोबाईल्सचे पार्ट्स

भारतामध्येच जर मोबाईल पार्ट्स बनविण्यात आले तर चीनच्या बाजारपेठेमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताकडून चीनला मिळणारा अजून एक मोठा दणका असेल.

भारतात मोबाईल प्रोडक्शनच्या १०० हून अधिक कंपन्या आहेत. मात्र मोबाईलचे पार्ट्स अजूनही बाहेरुन खासकरुन चीनवरुन मागवावे लागतात. मात्र आता या समस्येवर देखील तोडगा निघणार आहे. टाटा सन्स ही कंपनी आता देशात मोबाईलचे पार्ट्स बनवण्याच्या तयारीत आहे. चीनमधून कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर अॅप्पलसारख्या अनेक विदेशी कंपन्या चीनबाहेर मोबाईल प्रोडक्शन कंपन्यांसाठी संधीच्या शोधात आहेत. अशात चंद्रशेखरन यांची योजना आहे की, या कंपन्यांसोबत जाऊन त्यांनी भारतात मोबाईल पार्ट्सची निर्मिती केली जावी. माहितीनुसार या मोबाईल पार्ट्सच्या निर्मितीची सुरुवात महागड्या आयफोनपासून होईल.

भारतात मोबाईल प्रोडक्शन करणाऱ्या १०० हून अधिक कंपन्या आहेत. मात्र मोबाईलचे पार्ट्स अजूनही बाहेरुन विशेष करुन चीन कडून मागवावे लागतात. मात्र आता या समस्येवर देखील तोडगा निघणार आहे. टाटा सन्स ही कंपनी आता देशात मोबाईलचे पार्ट्स बनवण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार टाटा सन्स ही कंपनी तामिळनाडूमध्ये मोबाईलचे पार्ट्स प्रोडक्शनचा एक प्लांट बनवण्याची योजना करत आहे. या प्लांटमध्ये विदेशातून अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याची देखील माहिती आहे. टाटाच्या या प्लांटमध्ये सर्वात आधी आयफोनचे पार्ट्स बनवले जाणार असल्याची माहिती आहे. मोबाईलचे पार्ट्स बनविण्याच्या प्लांटची योजना टाटा सन्स ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनि केली असल्याची माहिती समोर आली आहे. रतन टाटा विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांची एक समिती तयार करू शकतात. यात तत्वज्ञान आणि मानव्यशास्त्र क्षेत्रातील लोकांचा समावेश असू शकतो. रतन टाटा हे टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट या दोन्ही संस्थांचे नेतृत्व करणारे अखेरचे चेअरमन होते.

तामिळनाडू सरकारने नुकतेच इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी २०२० घोषित केली आहे. या धोरणाचं लक्ष्य २०२५ पर्यंत आऊटपुट वाढवून १०० अब्ज डॉलर करण्याचे आहे. जे त्यावेळी देशातील एकूण इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्टचा एक चतुर्थांश भाग असेल. टाटा  इलेक्ट्रॉनिक्सला तामिळनाडू इंडस्ट्रिअल कॉरपोरेशनने होसूरमध्ये ५०० एकर जमीन दिली आहे. एका रिपोर्टनुसार टाटा कंपनीनं या प्रोजेक्टसाठी १.५ अब्ज डॉलर्सचं कर्ज घेण्याची तयारी केली आहे. यापैकी ७५ कोटी ते एक अब्ज डॉलर्सची रक्कम एक्टर्नल कमर्शियल बॉरोइंगच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. या नव्या प्लांटसाठी आणि कंपनीसाठी सीईओची देखील नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे भारतामध्येच जर मोबाईल पार्ट्स बनविण्यात आले तर चीनच्या बाजारपेठेमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताकडून चीनला मिळणारा अजून एक मोठा दणका असेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments