Saturday, March 6, 2021
Home Tech News टेलिग्रामने अपडेट केले नवीन फिचर

टेलिग्रामने अपडेट केले नवीन फिचर

टेलिग्रामने नवं अपडेट iOS वर जारी केलं आहे. या नव्या अपडेटमुळे यूजर व्हॉट्सअॅप आणि इतर अॅप्समधून सहज चॅट्स आणि इतर डेटा इम्पोर्ट करता येणार आहे. यासाठी तुम्हाला टेलिग्रामचं मायग्रेशन टूल वापरावं लागणार आहे. या टूलची माहिती Telegram 7.4 अपडेटमध्ये देण्यात आली आहे. मात्र काही यूजर्सच्या माहितीनुसार टेलिग्रामच्या 7.4 1 मध्येही मायग्रेशन टूल उपलब्ध आहे. त्यातूनही व्हॉट्सअॅपचे चॅट सहज इम्पोर्ट करता येणार आहेत. त्यामुळे या नव्या अपडेटच्या मदतीने अनेक यूजर्स टेलिग्रामशी जोडले जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या मते या नव्या अपडेटमुळे टेलिग्राम यूजर्सची संख्या वाढण्यात मदत होणार आहे. टेलीग्रामने सध्या iOS अपडेट नोटमध्ये याचा उल्लेख केला आहे. या व्यतिरिक्त, मायग्रेशन टूलचा इतर कुठेही ऑफिशियल उल्लेख नाही. मात्र Android फोनसाठी हे टूल कधी येईल या बद्दल सध्या माहिती उपलब्ध नाही.

व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार युजर्स बुचकळ्यात पडले आहेत. कंपनीला असे वाटते की, या दरम्यान व्हॉट्सअॅपची नवी प्रायव्हेसी पॉलिसी नीट वाचून आणि समजून घ्यावी. नवी पॉलिसी लागू करण्याची तारीख पुढे वाढवण्याच्या निर्णयाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. असे न झाल्यास व्हॉट्सअॅपवरील अॅक्टिव्ह युजर्सच्या संख्येत जबरदस्त घट होऊ शकते. व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीमुळे विविध प्रश्न उपस्थितीत होत आहेत. सायबर मीडिया रिसर्चच्या एका सर्वे नुसार २८  टक्के युजर्सकडून आता व्हॉट्सअॅपचा वापर करणे बंद करण्याचा विचार करत आहेत. तर ७९ टक्के युजर्सने अद्याप याबद्दल विचार केलेला नाही की, व्हॉट्सअॅप सुरु ठेवावे की नाही. व्हॉट्सअॅप आपली प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी २०२१  पासून लागू करणार होता. पण सध्या काही महिन्यांसाठी त्याला स्थगिती देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपचं सिक्युरिटी अपडेट आल्यानंतर अनेकांनी व्हॉट्सअप अॅप डिलिट करुन वेगळा पर्याय निवडला. आता अनेकांना व्हॉट्सअप  सो़डून सिग्नल आणि टेलिग्राम अॅप्स वापरण्यास सुरुवात केली आहे. कमी वेळात या दोन्ही अॅप्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र काहीजण अद्यापही व्हॉट्सअॅप सोडावं का?याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. याला कारण म्हणजे व्हॉट्सअॅपमध्ये असलेल्या त्यांचे चॅट्स आणि इतर डेटा. मात्र जे या कारणामुळे व्हॉट्सअॅप सोडू शकत नाहीत, त्यांच्यासाठी टेलिग्रामने यावर उपाय शोधला आहे.

पाहूया कशी आहे त्यांची प्रक्रिया -:

जे व्हॉट्सअॅप चॅट मायग्रेट करायचे आहेत ते उजवीकडून डावीकडे स्वाईप करा. तेथे More पर्यायावर जावे लागेल. तेथे दिलेल्या Export Chat च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. एका पॉप अपद्वारे विचारलं जाईल की आपणास चॅट अटॅचमेंटसह किंवा चॅट अटॅचमेंटविना एक्सपोर्ट करायचे आहे.टेलीग्राममध्ये iOS शेअर शीटने हे इम्पोर्ट करता येणार आहे. त्यानंतर यूजरला टेलिग्राम निवडावे लागेल. त्यानंतर Contact किंवा Group निवडण्यास सांगितले जाईल. आता तुम्हाला ज्या चॅटला मायग्रेट करायचे आहे, कॉन्टॅक्ट चॅटमध्ये तुमची मेसेज हिस्ट्री सिंक होईल. इतर कोणत्या अ‍ॅप वापरत असल्यास, टेलीग्रामच्या खाली एक फ्लॅग मेसेज येईल ज्यामध्ये इम्पोर्डेड लिहिले असेल. हे फिजर पर्सनल कॉन्टॅक्ट आणि ग्रुप दोघांसाठी काम करते. इम्पोर्ट केलेल्या चॅटवर ओरिजनल टाईम स्टॅम्प आणि इम्पोर्टेड लिहिलेलं असेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments