Thursday, February 25, 2021
Home Tech News Redmi K40 चा फेब्रुवारी मध्ये होणार लाँच

Redmi K40 चा फेब्रुवारी मध्ये होणार लाँच

Redmi K40 लाँच संबंधी खास माहिती रेडमीचे जनरल मॅनेजर ल्यू विबिंग यांनी शेयर केली आहे. त्यांनी चीनच्या मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट विबो वर ब्रँडची आगामी फ्लॅगशीप स्मार्टफोन सीरीजच्या खास फीचर्सची माहिती उघड केली आहे. शाओमी पासून वेगळे होऊन स्वतंत्र ब्रँड बनल्यानंतर रेडमी आपला फ्लॅगशीप फोन रिलीज करीत आहे. कंपनीचा हा पहिला फ्लॅगशीप मॉडल Redmi K20 Pro होता. यानंतर कंपनीने Redmi K30 Pro लाँच केला होता. याला ग्लोबल मार्केटमध्ये Poco F2 Pro नावाने उपलब्ध करण्यात आले होते. आता स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा पहिला स्मार्टफोन Xiaomi Mi 11 लाँच केल्यानंतर कंपनीने याला चिपसेट सोबत Redmi K40 लाँच करण्याची घोषणा केली आहे.

कंपनी रेडमी के ४० आणि रेडमी के ४० प्रो लाँच करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कंपनीकडून रेडमी के ३० चे अनेक व्हेरियंट्स लाँच केले होते. यात रेडमी के ३० प्रो झूम एडिशनचा समावेश होता. यात वेगवेगळा कॅमेरा सेटअप दिला होता. या सीरीजमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा उल्लेख करण्यात आला होता. केवळ प्रो व्हेरियंटमध्ये हे चिपसेट देण्याची शक्यता होती. रेडमी के ४० प्रो स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा सर्वात स्वस्त हँडसेट होऊ शकतो. ब्रँडचे एग्जिक्युटीवह यांनी हेही सांगितले की, डिव्हाइसमध्ये सर्वात महाग फ्लॅट डिस्प्ले असणार आहे. याशिवाय 4000 mAh  बॅटरी दिली जाणार आहे. महाग डिस्प्लेचा अर्थ अमोलेड डिस्प्ले असतो. त्यामुळे प्रो व्हेरियंट या डिस्प्ले सोबत येवू शकतो. रेडमी के ४० सीरीजच्या सर्व हँडसेट्स १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेट एलसीडी पॅनल सोबत येतील. विबिंगच्या माहितीनुसार, रेडमी के ४० सीरीजला अधिकृत पणे फेब्रुवारी २०२१ मध्ये लाँच करण्यात येणार आहे.

रेडमी के ४० ची स्पेसीफिकेशन खालीलप्रमाणे आहेत.

  • Version Android v10
  • Performance Octa core (2.84 GHz, Single Core + 2.42 GHz)
  • Snapdragon 8886 GB RAM
  • Display 6.67 inches (16.94 cm) 395 PPI, AMOLED
  • Camera 64 + 8 + 5 + 2 MP
  • Quad Primary Cameras LED Flash 25 MP
  • 5 MP Dual Front Cameras
  • Battery 4500 mAh Fast Charging USB Type-C Port
  • 64 GB + 256 GB Expandable
  • Dual SIM: Nano + Nano

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments