Thursday, February 25, 2021
Home Tech News २०२०-२१ मध्ये नवीन स्मार्ट फोन्सची चलती

२०२०-२१ मध्ये नवीन स्मार्ट फोन्सची चलती

येत्या नवीन वर्षात भारतीय बाजारात अनेक नवीन स्मार्टफोन्स येत आहेत. नवीन वर्षात लॉन्च होणारे 5 स्मार्टफोन्सची माहिती आज आपण पाहूया. जेणेकरुन तुम्हाला नेमका कुठला स्मार्टफोन खरेदी करायचा याबाबत अडचणी येणार नाहीत. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात स्मार्टफोनचे  महत्व खूपच प्रमाणात वाढल्याचं पहायला मिळाले. यासोबतच आर्थिक व्यवहार सुद्धा स्मार्टफोनद्वारे होत आहेत. घरात बसून आपण मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधू शकतो. अशी हर एक कामेही मोबाईलवरच अवलंबून आहेत. नवीन वर्षात एन्ट्री करणारे नवीन ५ स्मार्ट फोन्स पाहूया.

सॅमसंग गॅलेक्सी A52 –

सॅमसंग गॅलेक्सी A52 हा स्मार्टफोन १८ जानेवारी २०२१ मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. याची किंमत १९,९९९ रुपये इतकी असण्याचा अंदाज आहे. या फोनमध्ये ६GB रॅम आहे. डिस्प्ले ६.५ इंचाचा आहे. यामध्ये मेन कॅमेरा एलईडी फ्लॅशसह ६४+१२+५+५ MP आहे आणि ३२ MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ४००० mAhची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये इंटरनल मेमरी १२८ GB दिली असून ती ५१२ GB पर्यंत वाढवता येईल.

वन प्लस नॉर्ड N100 –

वन प्लस नॉर्ड N100 हा स्मार्टफोन जानेवारी २०२१ मध्ये लॉन्च होणार असून त्याची किंमत १५,६९० रुपये इतकी आहे. या फोनमध्ये ४GB रॅम असून डिस्प्ले ६.५२ इंच इतका आहे. फोनमध्ये मेन कॅमेरा एलईडी फ्लॅशसह १३MP + २MP + २MP चा आहे. ८MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये इंटरनल मेमरी ६४ GB असून ती २५६GB पर्यंत वाढवता येईल. फोनची बॅटरी ५००० mAh इतकी आहे.

शाओमी रेडमी नोट 10 –

हा स्मार्टफोन जानेवारी २०२१ मध्ये लॉन्च होण्याची शक्यता असून त्याची किंमत १६,९९९ रुपये इतकी असण्याचा अंदाज आहे. या फोनमध्ये ४GB रॅम असून डिस्प्ले ६.६७ इंचाचा आहे. फोनचा मेन कॅमेरा एलईडी फ्लॅशसह ६४ + ८ +२ +२ MP इतका आहे. फ्रंट कॅमेरा १६MP चा असून फोनमध्ये ४८२० mAh ची बॅटरी असणार आहे. फोनमध्ये इंटरनल मेमरी ६४ GB ची असून ती ५१२ GB पर्यंत वाढवू शकतो.

रियलमी X7 –

रियलमी X7 हा स्मार्टफोन २६ जानेवारी २०२१ रोजी लॉन्च होण्याची शक्यता असून त्याची किंमत १९,२९१ रुपये असणार आहे. या फोनमध्ये ६ GB रॅम देण्यात आला असून डिस्प्ले ६.४३ इंचाचा आहे. फोनमध्ये मेन कॅमेरा एलईडी फ्लॅशसह ६४ + ८ +२ +२ MP इतका आहे. फ्रंट कॅमेरा ३२ MP आहे. इंटरनल मेमरी १२८ GB इतकी असून ती वाढवता येणार नाहीये. फोनमध्ये ४००० MAh बॅटरी देण्यात आली आहे.

रिअलमी V5 –

रिअलमी V5 हा स्मार्टफोन जानेवारी २०२१ मध्ये लॉन्च होण्याची शक्यता असून त्याची किंमत १६,१९० रुपये असण्याचा अंदाज आहे. या फोनमध्ये ६GB रॅम असून डिस्प्ले ६.५5 इंचाचा आहे. मेन कॅमेरा एलईडी फ्लॅशसह ४८ + ८ +२ +२ MP आहे. फ्रंट कॅमेरा १६MP चा आहे. बॅटरी ५००० MAh इतकी असून इंटरनल मेमरी ६४GB आहे जी ५१२GB पर्यंत वाढवू शकतो. हि आहेत नवीन मोबाईलची काही बेसिक फीचर्स.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments