Monday, March 1, 2021
Home Tech News नकारात्मकता नष्ट करण्यासाठी एक सॉलिड फंडा !

नकारात्मकता नष्ट करण्यासाठी एक सॉलिड फंडा !

अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातल्या जोश टर्नयाक नावाच्या १६ वर्षांच्या मुलाने हे स्वप्न ‘कोविड एन्वेडर्स’ या नावाचा व्हिडीओ गेम तयार केला आहे. या गेममध्ये तुम्ही केवळ एका क्लिकमध्ये कोरोना विषाणूला मारू शकता. व्हिडीओ गेम खेळणाऱ्या व्यक्ती कोरोना प्रतिबंधक लशीची सीरिंज घेऊन कोरोना विषाणूला मारू शकतात. लोकांच्या मनाला आनंद देईल असं काही तरी या काळात देणं, हा गेम तयार करण्यामागचा उद्देश होता, असं जोश यानं सांगितलं. सत्तरच्या दशकात स्पेस इन्व्हेडर्स  हा व्हिडीओ गेम लोकप्रिय होता. त्यापासून जोशने प्रेरणा घेतली. रोमन पेसाखोविच नावाच्या जोशच्या मित्राने कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी वेबसाइट तयार केली. त्यामुळे जोशलाही लोकांचा उत्साह वाढेल असं काही तरी करायची इच्छा होती. लोकांचा ताण कमी व्हावा आणि त्यांचं मनोरंजन व्हावं, अशी त्याची इच्छा होती. म्हणून त्याने हा गेम तयार केला. वयाच्या ११ व्या वर्षापासून जोश कोडिंग शिकतोय. त्यामुळे गेमचं डिझायनिंग त्याच्यासाठी सोपं होतं; मात्र सर्व प्रकारच्या डिव्हाइसवर तो गेम खेळता येण्याच्या दृष्टीने आवश्यक ती व्यवस्था करणं अवघड होतं. त्यामुळे विविध डिव्हाइसवर तो गेम लाँच करण्यासाठी त्याला दीड महिना लागला. हा गेम तयार करण्यासाठी जोशने आपलं सारं ज्ञान पणाला लावलं. कोविड- १९ मुळे गेल्या वर्षीपासून त्याचं होम-स्कूलिंग सुरू आहे. लोक मिळालेल्या वेळाचा वापर नवं काही शिकण्यासाठी किंवा काही तयार करण्यासाठी करू शकतात, असं त्याला वाटतं.

जोशने सांगितलं, की कोरोना विषाणू प्रतिबंधक लस आणि विषाणूशी लढण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यांबद्दलची जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने या गेमद्वारे केला आहे. जोशने या गेमसोबत वाजण्यासाठी एक विशेष गाणंही तयार केलं आहे. गाण्याचे शब्द कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासंबंधी आणि त्याला नियंत्रित करण्याच्या मार्गां संदर्भात आहेत. हे गाणं ऐकताना लोक हसून आनंद घेतात आणि त्या गाण्याबद्दल खूप बोललं जात आहे, असं जोश सांगतो. या गेममध्ये एक सीरिंज असून, ती लाल रंगाच्या कोरोना विषाणूच्या दिशेने सोडायची आहे. यातले काही विषाणू मास्क घातलेले आहेत, काही मोठे आहेत, तर काही लहान. या विषाणूला मारायचा प्रयत्न सुरू केला, की गाणं वाजायला सुरुवात होते.

२०२० या वर्षाला निरोप देऊन २०२१ मध्ये प्रवेश करताना मानवाच्या हाती कोरोनाप्रतिबंधक लसीचं अस्त्र आलं आहे. तरीही जग कोरोनामुक्त व्हायला अद्याप बराच कालावधी आहे. त्यामुळे कोरोना विषाणूला नष्ट करून कोविडमुक्त होण्याची वाट प्रत्येक जण पाहत आहे. पन त्यातूनही सकारात्मक जीवन जगण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयोग नक्कीच यशस्वी झाला असे जोश म्हणतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments