Monday, March 1, 2021
Home Tech News युजर्सनी शोधले व्हॉट्सअ‍ॅपला सबस्टीट्युट

युजर्सनी शोधले व्हॉट्सअ‍ॅपला सबस्टीट्युट

व्हॉट्सअ‍ॅप च्या यूजर्सना कंपनीच्या नव्या प्रायव्हेट पॉलिसीला लवकरच मान्यता द्यावी लागणार आहे. जर या प्रायव्हेट पॉलिसीला मान्यता दिली नाही तर यूजर्स पुढच्या महिन्यातील ८ तारखेपासून व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करु शकणार नाहीत. कंपनीच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार कंपनी आता यूजर्सची माहिती ही इतर कंपन्यांना विकू शकणार आहे आणि या धोरणाला यूजर्सने मान्यता द्यावीच लागेल अन्यथा त्यांचे अॅप काम करणे बंद होणार आहे. कंपनीच्या नव्या प्रायव्हेट पॉलिसीला यूजर्सचा वाढता विरोध लक्षात घेता व्हॉट्सअ‍ॅपला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक त्यांच्या यूजर्सचे मेसेज वाचू शकणार नाहीत किंवा त्यांचे कॉल कोणीही ऐकू शकणार नाहीत. यूजर्स जे काही शेअर करतील ते केवळ यूजर्समध्येच राहील. व्हॉट्सअ‍ॅप  मधील व्यक्तिगत मेसेज एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शद्वारे सुरक्षित आहेत. या सुरक्षेशी व्हॉट्सअ‍ॅप  तडजोड करणार नाही असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या धोरणांचा फायदा हा इतर अॅपना होताना दिसतोय. याच मुळे गेल्या केवळ ७२ तासात टेलिग्रामच्या यूजर्समध्ये अडीच कोटी नव्या यूजर्सची भर पडली आहे. कंपनीचे संस्थापक पावेल दुरोव यांनी सांगितलं की टेलिग्रामच्या अॅक्टिव्ह यूजर्सची संख्या ५० कोटीपेक्षा जास्त आहे. गेल्या ७२ तासात अडीच कोटी नव्या यूजर्सनी हे अॅप  डाउनलोड केलं आहे. कंपनीच्या मते जगभरातील अनेक लोक आता टेलिग्रामच्या वापराला प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामध्ये ३८ टक्के यूजर्स हे आशियायी देशातील असून २७ टक्के यूजर्स हे यूरोप आणि २१ टक्के यूजर्स हे अमेरिकेतील आहेत. टेलिग्राम  हे अॅप २०१३ मध्ये सुरु करण्यात आलं होतं.

टेलिग्राम मध्ये असे काही खास फिचर्स आहेत जे व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मिळत नाहीत. टेलिग्राममध्ये एक सीक्रेट चॅटचा पर्याय असतो. त्यासाठी यूजर्सना एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन सुरु करावे लागते. त्याचसोबत क्लाउड स्टोरेजच्या मदतीने आपण आपले मेसेज, डॉक्यूमेन्ट आणि मीडिया फाइल्स स्टोअर करु शकतो. विशेष म्हणजे आपण अनेक डिव्हाइसमध्ये एकाच टेलिग्रामच्या अकाउंटचा वापर करु शकतो.

टेलिग्रामने यापूर्वी दोन स्पायडर मॅन मीम शेअर करुन व्हॉट्सअ‍ॅपची थट्टा केली होती. आता टेलिग्रामने दुसर्‍या मीमद्वारे व्हाट्सएपची थट्टा व्हायरल होत आहे. टेलिग्रामने घानाच्या त्या व्हायरल व्हिडिओची एक जीआयएफ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे,  ज्यात चार लोक मृतदेहाची पेटी घेऊन नाचताना दिसत आहेत. यात टेलीग्रामने मृतदेहाची पेटी ऐवजी व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीचा मजकूर लिहलेला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments