Saturday, March 6, 2021
Home Tech News VIVO Y51 PRO भारतीय बाजारपेठेत दाखल

VIVO Y51 PRO भारतीय बाजारपेठेत दाखल

मोबाईलच्या स्पर्धेमध्ये सगळ्या मोबाईल कंपन्या कायम एकमेकांना टक्कर देत असतात. एका पेक्षा एक नवीन फ़िचर असलेले मॉडेल्स लाँच करत असतात. त्यातच ५ जी कनेक्टीव्हिटी सपोर्ट करणारे मॉडेल्स तयार करण्याबद्दल जगभरातील सगळ्याच कंपन्यामध्ये चढाओढ सुरु असते. विवोने आज भारतात ५ जी सेगमेंटचा जबरदस्त फोन Vivo V51 Pro 5G लाँच केला आहे. याची खूप दिवसांपासून उत्सूकता होती. Vivo Y51 मध्ये कंपनी भारतात Qualcomm Snapdragon 665 SoC प्रोसेसर सोबत लाँच करू शकते. तसेच या फोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. या फोनची भारतात रियलमी,  ओपो, एमआय आणि सॅमसंगसह अन्य कंपन्याच्या मिड रेंज मोबाइल सोबत टक्कर पाहायला मिळणार आहे. चीनची स्मार्टफोन बनविणारी कंपनी विवो इंडिया लवकरच भारतीय बाजारपेठेत आपला आणखी एक स्मार्टफोन Vivo Y51 २०२० लाँच करू शकते. विवोने हा फोन Vivo S1 Pro चा रिप्लेसमेंट आहे. या Vivo Y51 मध्ये कंपनी भारतात Qualcomm Snapdragon 665 SoC  प्रोसेसर सोबत लाँच करण्याची शक्यता आहे.

पाहूया Vivo Y51 ची काही खास फीचर्स :

Vivo Y51 फोनमध्ये ६.३८ इंचाचा full-HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. याचा रिझॉल्यूशन 1080×2340 पिक्सल इतके आहे. यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. यात अँड्रॉयड १० बेस्ड Fun touch OS 10 ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 665 SoC चा प्रोसेसर दिला आहे. त्याचप्रमाणे Vivo Y51 ला विवो 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरियंट लाँच करणार आहे. कंपनी याला ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम व्हेरियंट सुद्धा लाँच करू शकते.

विवो या मिड रेंज फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा म्हणजेच क्वॉड ४ रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट शूटर आहे. विवोच्या या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 4,500MAH ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनच्या एका बाजूला फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. कनेक्टिविटी साठी यामध्ये ड्यूल बैंड वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, USB टाइप-C, GPS आणि USB OTG सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भारतीय बाजारपेठेमध्ये या मोबाईलला किती उंची  गाठता येते पाहू.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments