Monday, March 1, 2021
Home Tech News VIVO X60 लौंच आधीच अनलॉक

VIVO X60 लौंच आधीच अनलॉक

आघाडीची स्मार्टफोन कंपनी विवो मोबाईलचे दोन मॉडेल्स विवो X60 आणि विवो X60 Pro चे फोटो लीक झाले आहेत. लीक झालेल्या फोटोंमधून दोन्ही मॉडेल्सचे लूक आणि काही फीचर्स समोर आले आहेत. हे दोन्ही मॉडेल्स अँड्रॉईड ११ ओरिजन ओएसवर आधारित यूआयवर चालतील अशी माहिती आहे. स्मार्टफोन कंपनी २९ डिसेंबरला ही दोन्ही मॉडेल्स मार्केटमध्ये आणणार आहे. चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट wiebo ने या मॉडेलचे फोटो शेअर केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विवो X60 आणि X60 Pro मध्ये सॅमसंगचा एक्सिनोस १०८० एसओसी प्रोसेसर असेल. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत ३९,४०० रुपये असेल. व्हिवो X60 ची ही बेस मॉडेल किंमत सांगितली जात आहे. प्रो व्हेरिएंटची किंमत थोडी जास्त असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. Vivo X60 सीरीजचे स्मार्टफोन्स 5जी कनेक्टिविटी सह सादर केले जातील. इतकेच नव्हे तर आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या सीरीजच्या फोन्स मध्ये ६.६५ इंचाचा पंच होल डिस्प्ले दिला जाईल, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन १०८०×२३४० पिक्सल असू शकतो. सोबतच याचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 120Hz असेल. हँडसेटमध्ये बेजल लेस डिस्प्ले आहे. फोनमध्ये उजच्या बाजुला व्हॅल्यूम आणि पॉवर बटन दिले जाणार आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत येतो. तसेच वीवोचे हे नवीन फोन्स ८GB RAM सोबतच १२८ GB आणि २५६ GB वेरियंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

वीवो एक्स60 सीरीजच्या स्मार्टफोन्स मध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा असेल. कॅमेरा सेटअप मध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. तसेच ८ मेगापिक्सलची टेलिफोटो लेंस, ८ मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस सोबतच १३ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर पण असू शकतो. तसेच फोन मध्ये व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. कॅमेरा आणि डिस्प्ले व्यतिरिक्त Vivo X60 सीरीजचे इतर फीचर्स पाहता या स्मार्टफोन्सचा पावर बटन रेड कलर मध्ये येऊ शकतो, Dark blue आणि light blue कलर मध्ये लॉन्च होणाऱ्या या फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4315 mAh ची बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिलेली आहे. मिळालेली माहिती हि सोशल मिडिया द्वारे मिळालेली असून त्यामध्ये सत्यता किती % पर्यंत आहे ते मोबाईलचे लौंचींग झाल्यावरच पाहायला मिळेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments