Friday, February 26, 2021
Home Tech News वोडाफोन आयडियाच्या ग्राहकांना धक्का

वोडाफोन आयडियाच्या ग्राहकांना धक्का

वोडाफोन-आयडिया टेलिकॉम कंपनी दिल्लीत १५ जानेवारीपासून आपली ३ जी सेवा बंद करणार आहे. भारतात अनेक वर्षापासून ४ जी सर्विस सुरू आहे. ज्यात युजर्संना चांगली स्पीड सोबत जास्त डेटा मिळू शकतो. रिलायन्स जिओ नंतर ४ जी सर्विस सेवेत क्रांती आली आहे. वोडाफोन आयडियाने गेल्या वर्षा बेंगळुरू आणि मुंबई सारख्या शहरात ३ जी सिम सेवा बंद केलेली आहे. आता दिल्लीत ही सेवा बंद केली जाणार आहे. २ जी व्हाइस कॉलिंग सर्विस सुरु राहणार आहे. वोडाफोन-आयडियाने ४जी कस्टमरवर कंपनीने घोषणा केली आहे. तर २जी कस्टमर व्हाइस कॉलिंगची सुविधा घेवू शकतात. परंतु, जुन्या सिम कार्डवर इंटरनेटची मजा घेवू शकत नाही. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या माहितीनुसार, दिल्ली सर्कल मध्ये वोडाफोन आयडियाचे १ कोटी ६२ लाख हून जास्त सब्सक्राइबर्स आहेत. यात जितकी ३ जी युजर्स आहेत. त्यांना १५ जानेवारी पर्यंत आपले सिम ४ जी मध्ये पोर्ट करावे लागणार आहे. कंपनीने उचललेलं हे पाऊल म्हणजे स्पेक्ट्रम रि-फार्मिंगचा एक भाग आहे, ज्याअंतर्गत ऑपरेटर ४जी सेवांसाठी आपल्या ३ जी  स्पेक्ट्रमचा वापर करत आहे.

वोडाफोन-आयडिया १५ जानेवारी पासून दिल्लीतील ३ जी सर्विस बंद करणार आहे, कंपनीने अशी घोषणा केली आहे. १५ जानेवारी पर्यंत आपल्या ३ जी सिमला ४ जी मध्ये पोर्ट करून घ्या. नाही तर १५ जानेवारीपासून सेवा बंद केली जाणार आहे. त्यामुळे दिल्लीतील वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना नंबर पोर्ट करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत वेळ आहे. याबाबत माहिती देण्यासाठी वोडाफोन-आयडिया कंपनीने दिल्ली सर्कलमधील ग्राहकांना SMS  करून पाठवण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांनी आपलं जुनं सिम १५ जानेवारी २०२१ आधी ४ जी मध्ये अपग्रेड करावे असा मेसेज पाठवण्यात येत आहे. जे ग्राहक आपलं सिम ४ जी मध्ये अपग्रेड करू शकणार नाहीत,  त्या ग्राहकांना Vi  २ जी  द्वारे केवळ व्हॉईस कॉलिंग सुविधा देणं सुरू ठेवणार आहे. मात्र वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना आपल्या फोनवर डेटा आणि व्हॉईस सेवा सुरू ठेवायचं असल्यास, त्यांना ३ जी सिम ४ जी मध्ये अपग्रेड करावेच लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments