Monday, March 1, 2021
Home Tech News व्हॉट्सअॅपची पिछेहाट

व्हॉट्सअॅपची पिछेहाट

अनेकांनी व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या अॅप्सचा पर्याय स्वीकारला. पण यादरम्यान लाखो युजर्सनी एकाच वेळी सिग्नल डाऊनलोड केल्याने यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आणि जगभरातल्या लोकांना हे अॅप वापरण्यात अडचणी येत आहेत. तांत्रिक अडचणी आल्याचं सिग्नलने ट्विटरवर म्हटलंय. दरम्यान व्हॉट्सअॅपच्या नव्या नियमांमुळे अनेक युजर्सनी आपला मोर्चा सिग्नल आणि टेलिग्राम अॅपकडे वळवला. व्हॉट्सॲपशी मागची सात-आठ वर्षं आपलं एक नातं तयार झालं होतं. तिथल्या ग्रुपमध्ये एकाच वेळी शंभर जणांशी बोलता येणं, कामाच्या महत्त्वाच्या गोष्टी शेअर करता येणं हे सगळं खूप सोयीचं होतं. पण आता व्हॉट्सॲपच्या बदललेल्या गोपनीयता धोरणानंतर सगळंच बदललंय.

एकंदरीतच व्हॉट्सॲपच्या सुरक्षिततेविषयी अनेक शंका वेळोवेळी व्यक्त करण्यात आल्या. आताच्या बदललेल्या धोरणामुळे व्हॉट्सॲपवर तुम्ही केलेली देवाण-घेवाण अगदी गूगल सर्चवरही मिळू शकेल, असं बोललं जात आहे. त्यातूनच जगभरात लोकांनी व्हॉट्सॲपला रामराम करून टेलिग्राम आणि सिग्नलचा वापर सुरू केला आहे. एका जागतिक सर्वेक्षणातून असं समोर आलंय की, मागच्या दोन दिवसांत एक लाख लोकांनी सिग्नल डाऊनलोड केलं तर २० लाख लोकांनी टेलिग्राम. याउलट व्हॉट्सॲप डाऊनलोड ११ टक्क्यांनी कमी झाले.

परंतु, मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे की, वैयक्तिकरित्या व्हॉट्स्अॅप वापरणाऱ्यांवर नवीन धोरणाचा कुठलाही परिणाम होणार नाही. फक्त ज्यांची बिझिनेस अकाऊंट आहेत, ती माहिती वितरित केली जाईल आणि व्हॉट्स्अॅपने अलीकडे ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरू केली. त्या अकाऊंटची माहिती जाहिरातदारांबरोबर शेअर केली जाईल. त्यामुळे नियमित व्हॉट्स्अॅप वापरणाऱ्यांवर फारसा परिणाम होणार नाही”.

त्याचप्रमाणे, वाढत्या वादामुळे व्हाट्सएप मेसेजिंग अॅपने आता प्रायव्हसी अपडेट योजना पुढे ढकलली आहे. आता ८ फेब्रुवारीला कोणतेही व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद होणार नाही. कंपनी हळूहळू १५ मे पर्यंत पॉलिसी लागू करेल. कंपनीचा असा विश्वास आहे की पॉलिसीची मुदतवाढ दिल्यास वापरकर्त्यांना ती समजून घेण्यासाठी वेळ मिळेल. व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी फेसबुकने म्हटले आहे की अॅपच्या नवीन अपडेटविषयी लोकांना खूप गैरसमज आहेत, ज्यामुळे या क्षणी नवीन अपडेट थांबवण्यात आले आहे. कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही ती तारीख पुढे ढकलत आहोत, ज्यामध्ये वापरकर्त्यांना धोरण आणि शर्ती वाचण्यास आणि स्वीकारण्यास सांगितले जाईल. ८ फेब्रुवारी रोजी कोणतेही खाते डिलीट किंवा सस्पेंड केले जाणार नाही. आम्ही आमच्या गोपनीयता आणि सुरक्षा धोरणाबद्दल स्पष्ट माहिती देऊ आणि लोकांमधील गोंधळ दूर करू यानंतर, कंपनी हळूहळू नवीन धोरणाबद्दल लोकांचे मत विचारेल. यासाठी १५  मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments