Friday, February 26, 2021
Home Tech News सेफर इंटरनेट डे कधी असतो ?

सेफर इंटरनेट डे कधी असतो ?

कोरोनाच्या काळात भारतातील इंटरनेटच्या वापरात आधीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचं वृत्त आहे. त्यामध्ये वर्क फ्रॉम होम तसेच इतर काही कारणामुळे अनेक आर्थिक व्यवहार हे मोबाईल अथवा इतर ऑनलाइन माध्यमातून झाले आहेत. त्या अहवालात असंही सांगण्यात आलं आहे की या काळात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आजचा दिवस जगभर ‘सेफर इंटरनेट डे’ म्हणजे सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय. ऑनलाइन फ्रॉडच्या वाढत्या घटनांच्या या काळात आपण आपले इंटरनेट अधिक सुरक्षित आणि अधिक जबाबदार पद्धतीने कसं वापरायचं याची माहिती असणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्वाची असल्याने आजच्या दिवशी ९ फेब्रुवारीला सेफर इंटरनेट डे साजरा करण्यात येतोय. सर्वेक्षणानुसार, इंटरनेटचा वापर करणाऱ्यांपैकी बहुतांश लोकांना सायबर सिक्युरिटीबाबतचे ज्ञान नव्हते. त्यांची मुलं इंटरनेटवर काय पाहतात याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. ५७ टक्के लोकांनी मान्य केलं की त्यांना त्यांचा ईमेल आयडी, ऑनलाइन खाती असुरक्षित वाटतात. ६० टक्के पालकांना हे ठाऊकच नाही की त्यांची मुलं इंटरनेटवर काय पाहतात. परिणामी मुलं जाणते-अजाणतेपणी इंटरनेटचा दुरुपयोग करतात आणि त्याचे गंभीर परिणाम होतात. सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या ६७ टक्के लोकांनी कोणत्याही संकेतस्थळावर साइन अप करताना वेळेचे आणि अन्य सुरक्षा आणि लीगल गाईड लाइन्स डीनाय केल्या आहेत. ५४ टक्के लोकांनी सांगितले की त्यांनी गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून त्यांचे सोशल मीडिया अकाउंटचे पासवर्ड बदलले नाहीत. ३१ टक्के लोक म्हणाले की त्यांनी त्यांचे पासवर्ड कधी बदलले होते ते त्यांना आठवत नाही.

When is Safer Internet Day

सर्वप्रथम २००४ साली युरोपमध्ये सेफर इंटरनेट डे साजरा करण्यात आला. तो काळ इंटरनेटचा वापर मर्यादित असण्याचा होता. पण भविष्यातील इंटरनेटच्या सुरक्षिततेचं महत्व लक्षात घेता तो युरोपमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. युरोपच्या या कृतीचे अनुकरण हळूहळू अनेक देशांनी केलं. सध्या जगातील जवळपास १२० देशात आज सेफर इंटरनेट डे साजरा करण्यात येतोय.

इंटरनेटचा वापर करताना सुरक्षिततेच्या खबरदारी घेण्यात आल्या नाहीत तर आपल्याला आर्थिक आणि मानसिक नुकसानीला सामोरं जाव लागतं. त्यामुळे इंटरनेटचा वापर करताना आपण सुरक्षितता बाळगायला हवी. कोणतेही अॅप वापरताना किंवा पेजवर जाताना आपण अनावश्यक परवानग्या मान्य करतो. त्याचा फायदा घेऊन संबंधीत कंपन्या आपला डेटा गोळा करतात, तसेच त्याचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी केला जातो. केवळ एका क्लिकवर आपल्या आयुष्यभराची कमाई उडू शकते. असे अनेक धोके इंटरनेट वापरताना असतात. अशा वेळी सायबर पोलिसांनी आवाहन केल्याप्रमाणे कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करु नये. त्यामुळे आपला सगळा डेटा वा पासवर्ड हे गोळा केले जातात. तसेच फॉरवर्डेड मेसेजवर विश्वास ठेऊ नये.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments