आदिपुरुष या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजच मुंबईत सुरुवात झाली होती. दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने स्वतः सोशल मीडियावर चित्रीकरण सुरु झाल्याचे जाहीर केले होते. प्रभासने चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर करत ‘आदिपुरुष आरंभ’ असे कॅप्शन दिले होते. हा मेगा बजेट ३ डी चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होईल. प्रत्यक्षदर्शीने पुढे सांगितल्यानुसार, सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास ही आग लागली आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला साधारण दोन तासांचा कालावधी लागला. या आगीमुळे आदिपुरुषच्या निर्मात्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. सेटवर लावण्यात आलेला ग्रीन क्रोमा जळून खाक झाला आहे.
अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, ही लेव्हल २ ची आग आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या आग विझविण्यासाठी पोहोचल्या आहेत. लक्ष्मी पार्कमध्ये तयार करण्यात आलेल्या या सेटवर जेव्हा आग लागली तेव्हा ४०० हून अधिक लोक तिथे उपस्थित होते. सर्वांना सुखरुप तेथून बाहेर काढण्यात आले आहे. आगीमुळे स्टुडिओचे बरेच नुकसान झाले. सेटवर उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण सेट लाकूड आणि ताडपत्रीने तयार करण्यात आला होता. आगीची घटना घडली तेव्हा आदिपुरुष या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे प्रभास आणि सैफ अली खान घटनास्थळी हजर होते. जवळपास ४०० जण यावेळी तेथे उपस्थित होते. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही.
Motion capture begins. Creating the world of #Adipurush #Prabhas #SaifAliKhan #BhushanKumar @vfxwaala @rajeshnair06 @TSeries @retrophiles1 #TSeries pic.twitter.com/qAPlgL2qC9
— Om Raut (@omraut) January 19, 2021
मुंबईतील गोरेगाव भागातील एका स्टुडिओच्या भागाला भीषण आग लागली. येथेच आगामी आदिपुरुष या मेगा बजेट चित्रपटाचा सेट बनवण्यात आला होता. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभाष आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. आग लागली त्यावेळी या भागात अनेकजण कार्यरत होते त्यामुळं इथं एकच गोंधळ माजला. पण, लगेचच घटनास्थळाहून सर्वांना बाहेर काढण्यात आलं. आगीचं स्वरुप मोठं असल्यामुळं या भागात धुराचे लोट पसरले होते. मंगळवारी सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास ही आग लागली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवलं. असं असलं तरीही चित्रपटासाठीचं संपूर्ण सेट भस्मसात झालं आहे. जवळपास तासाभराच्या प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात आली. ज्यानंतर सदर घटनेमागच्या मूळ कारणाचाही तपास करण्यात येणार आहे.
तान्हाजी या ऐतिहासिक चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर ओम राऊत यांनी बहुप्रतिक्षित अशा आदिपुरुष या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी हाती घेतली. अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान याची नावंही चित्रपटाशी जोडली गेल्यामुळं त्याबाबतच कमालीही उत्सुकताही चाहत्यांच्या वर्गातून व्यक्त करण्यात आली. पण, चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत नाही, तोच सेटला आग लागल्यामुळं काहीशी नाराजगी सेटवर पसरली आहे.