पूर्वी वाड्यांच्या नावावरून तिथे कोणत्या जाती धर्माचा समाज राहतो ते ओळखले जात असे. राज्यातील अनेक खेड्यांना किंवा अगदी ग्रामीण भागातील वाड्यांना जातीवाचक नावे देण्यात आली आहेत. मात्र, ठाकरे सरकार आत्ता वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
काही वस्त्यांची जाती निहाय असलेली नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली, अशा स्वरुपाची नावे आहेत. ही बाब महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्याला भुषणावह नसल्याने सामाजिक सलोखा निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या वस्त्यांना आता समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येतील. यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करुन त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे असे करण्यात आलेले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असे करण्यात आलेले आहे. राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता, सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये “दलित” शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत “Scheduled Caste & Nav Bouddha” आणि मराठी भाषेत “अनुसूचित जाती व नव बौध्द” या संबोधनाचा वापर करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
यापुढे महाराष्ट्रात कोणतेही शहर किंवा ग्रामीण भागात वस्त्यांना जातीवाचक नावे नसतील, पूर्वीची जातीवाचक नावे बदलून त्यांना समता नगर,क्रांतीनगर अशी किंवा महापुरुषांची नावे देण्यात येतील;राष्ट्रीय एकात्मतेस वृद्धिंगत करणारा हा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत महाविकास आघाडी सरकारने घेतला. pic.twitter.com/QpQbS0crlm
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 2, 2020
राष्ट्रीय एकात्मता देशाला मजबूत आणि संघटित करते. राष्ट्रीय एकात्मता ही ती भावना आहे जी विविध धर्म, पंथ, जाती, पोशाख आणि संस्कृतीच्या लोकांना एकाच धाग्यात एकत्र बांधून ठेवते. त्यामुळे बरीचशी विविधता असूनही सर्व लोक भारतात एकत्र राहतात. अजूनही देशात जातपात, धर्म, पंथ यांच्या आधारावर भारतीय जनतेमध्ये भेदभाव केला जातो. जाती आणि धर्माच्या नावाखाली काही समाजकंटक एकमेकांबद्दल द्वेषभावना पसरवत असतात.देशाचे अखंडत्व आणि ऐक्य मोडून काढण्यासाठी काही समाजविघातक शक्ती कार्य करत असतात. म्हणून जर देशातील शांतता आणि एकता अबाधित ठेवण्यासाठी आजच्या काळात राष्ट्रीय एकात्मता फार आवश्यक आहे. महाराष्ट्रात कुठेही जातीच्या नावाने वस्ती असायला नको, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना दिल्या होत्या. वाड्या-वस्त्यांना शाहूनगर, समतानगर, ज्योतीनगर, प्रगतीनगर, विकासनगर अशी महापुरुषांची नावे देण्याचा विचार आहे. वंचित घटकाला न्याय देण्यासाठी काही बदल करणे गरजेचं आहे. यामुळे काहींची मनं दुखावली जातील, पण हे बदल करणे आवश्यक आहे, असं धनंजय मुंडे यांनी पुढे स्पष्ट केले आहे.
बातमी वाचून मसाला किंग उद्योगजकांनाचे आयुष्यच नजरेसमोर उभे राहिले. अतिशय सुंदर लिखाण. धन्यवाद