Friday, February 26, 2021
Home Uncategorized नवीन कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेसचा शेतकऱ्यांना पाठींबा

नवीन कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेसचा शेतकऱ्यांना पाठींबा

कृषी कायद्याविरोधात देशात सुरु असणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला जाण्याचा निर्णय़ घेतला. याच धर्तीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धडक मोर्चाही काढला. ही एकंदर परिस्थिती पाहता काँग्रेस मुख्यालयाबाहेर कलम १४४ लागू करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यात पुढाकाराने सहभाग घेताना दिसले. आंदोलनकर्ते काँग्रेस खासदार विजय चौकमध्येच थांबणार होते. परंतू, त्यांना मुख्यालयातच थांबवण्यात आले. पोलिसांच्या बळावर ही कारवाई करण्यात येत असल्यामुळे खासदारांमध्ये कमालीचा संताप आणि नाराजी पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे पोलिसांनी काँग्रेस आंदोनाच्या धर्तीवर सदर भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती. ज्यानंतर काही खासदारांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. एएनआयच्या वृत्तानुसार प्रियंका गांधींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्या पद्धतीनं काँग्रेसनं आंदोलनाचा कार्यक्रम आखला होता,  त्या पार्श्वभूमीवर पोलीसही त्यांच्या बळाचा वापर करताना दिसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, गुलाम नबी आझाद आणि अधिररंजन चौधरी यांना आंदोलनाची, राष्ट्रपतींच्या भेटीची परवानगी होती. पण, काँग्रेस मुख्यालयात जमणाऱ्या खासदारांचा अंदाज पाहता तिथं पोलिसांनी या भागात कलम १४४ लागू केले.

कृषी कायद्यांविरोधात आक्रमक भूमिकेत ठिय्या आंदोलन करतेवेळी प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधाला. राष्ट्रपती भवनापर्यंत आंदोलन करण्याची परवानगी न मिळाल्यामुळे १० जनपथ जवळच काँग्रेस आंदोलकांनी ठिय्या मांडला. यावेळी इथे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. माध्यमांशी संवाद साधते वेळी गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या खासदारां बाबतीत पोलिसांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आपण लोकशाही राष्ट्रात राहतो आणि आंदोलनकर्ते हे रितसरपणे निवडून आलेले खासदार आहेत. त्यांना राष्ट्रपतींची भेट घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ज्यासाठी त्यांना परवानगी मिळालीच पाहिजे. यासाठी का हरकत असावी? सध्याचे सरकार हे दिल्लीच्या सीमेवर असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचं म्हणणंच ऐकून घेत नाही आहे, असे त्या म्हणाल्या. देशातील शेतकऱ्यांना देशविरोधी म्हणणारं भाजप सरकार आणि त्यांचे समर्थकच पापी आहे,  असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी काँग्रेसलेखी भाजपची नेमकी भूमिका काय हे आधी त्यांनी स्वत: ठरवावं असं म्हणत गांधी यांनी उपरोधिक टीकाही केल्याचं पाहायला मिळाले. सरकारविरोधी कोणतीही भूमिका ही सध्या दहशतवादी दृष्टीकोनातूनच पाहिली जाते याचा निषेध करत गांधी यांनी काँग्रेसचं हे आंदोलन फक्त आणि फक्त देशातील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थच पुकारण्यात आलं होतं, हे स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments