Sunday, February 28, 2021
Home Uncategorized मराठी अभिनेत्री नेहा महाजन आणि रिकी मार्टिनच्या म्युझिकला ग्रामी नॉमिनेशन

मराठी अभिनेत्री नेहा महाजन आणि रिकी मार्टिनच्या म्युझिकला ग्रामी नॉमिनेशन

मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन नेहमीच काहीना काही कारणांनी चर्चेत असते. नुकत्याच आणखी एका विशेष कारणाने नेहा महाजन चर्चेत आली आहे. नेहासाठी हे वर्ष खूप खास ठरले आहे.  काही वर्षांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन ही एका न्यूड व्हायरल एमएमएसमुळे चर्चेत आली होती. या व्हायरल झालेल्या एमएमएसमध्ये ही अभिनेत्री नग्नावस्थेत दिसत होती. नंतर हा एमएमएस म्हणजे ‘छायम पोसिया वीडू’ या तमीळ भाषेतील चित्रपटासाठी तिने दिलेल्या नग्न दृश्यांचा असल्याचे समोर आले होते. २०१६ च्या या प्रकरणानंतर नेहाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण आता पुन्हा ती चर्चेत आली आहे ते तिच्या आणि लॅटीन पॉप किंग रिकी मार्टीन यांच्या ‘Pausa’ या अल्बमला मिळालेल्या मानाच्या ‘ग्रॅमी’ पुरस्कारांत नॉमिनेशन बद्दल. अभिनेत्री असण्याबरोबरच नेहा उत्तम सितार वादक आहे. नेहाने तिचे वडील विदुर महाजन यांच्याकडून सितार वादनाचे धडे घेतले आहेत. मागील १३ वर्षांपासून नेहाने अभिनया सोबतच सितार वादनाचे शिक्षण घेणेही सुरु केले होते. ज्यानंतर तिने या कलेवर प्रभुत्वही मिळवले आहे. तिच्या याच कलेने तिचे नाव साता समुद्रापार पोहोचविले आहे. रिकीने नेहाकडून त्याच्या या अल्बमसाठी सितारची रेकॉर्ड मागवली होती. या अल्बमने लॅटीन ग्रॅमी मध्येही आपले नाव गाजवले आहे. नेहा महाजन आणि रिकी मार्टीन ‘Pausa’ या अल्बमला बेस्ट लॅटीन पॉप विभागामध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. नेहाने स्वतः ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ती नेहमी आपले सितार वादनाचे व्हिडीओ पोस्ट करत असते.

काही वर्षांपूर्वी हॉलीवूड अभिनेत्री प्रमाणेच हॉट दृश्ये दिल्याने नेहा चर्चेत आली होती. मूळची तळेगावची असलेली नेहा अकरावी सुरु असताना अमेरिकेत गेली. त्यामुळे बारावी पर्यंत ती अमेरिकेत शिकली आहे. लहानपणापासूनच नेहाला अभिनय क्षेत्राचं आकर्षण होतं. पण, त्याचा करिअर म्हणून तिने कधी विचार केला नव्हता. एमए झाल्यानंतर मात्र अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं तिने पक्कं ठरवलं. बारावी झाल्यानंतर भारतात आल्यानंतर नेहाला पहिला ब्रेक मिळाला तो सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या ‘बेवक्त बारीश’ या चित्रपटात. एम.ए करताना तिला दीपा मेहता यांच्या मिडनाइट्स चिल्ड्रन  या चित्रपटात काम करायची संधी मिळाली. कॉफी आणि बरंच काही चित्रपटाच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना नेहाची ओळख झाली. नेहाला मिळालेल्या नामांकनामुळे जगभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

‘आजोबा’, ‘संहिता’, ‘सिद्धांत’, ‘नीळकंठ मास्तर’ या मराठी तर ‘जीबून संदेश’ या आोरिया फिल्ममध्ये नेहाने भूमिका केल्या आहेत. नेहाला विविध भाषांमध्येही खूप रस आहे.िची आवड तिने चित्रपटांमध्येही जपली आहे. मल्याळम, बंगाली, हिंदी, मराठी अशा विविध भाषीय चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments