Friday, February 26, 2021
Home Uncategorized जर्कातावरुन उड्डाण केलेले विमान समुद्रात कोसळल्याची शक्यता

जर्कातावरुन उड्डाण केलेले विमान समुद्रात कोसळल्याची शक्यता

इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्या अदिता इरावती यांनी सांगितले की, बोईंग ७३७ विमानाने दुपारी १.५६ वाजता जकार्ताहून उड्डाण केले आणि दुपारी अडीचच्या सुमारास कंट्रोल टॉवरशी असलेला संपर्क तुटला. इंडोनेशियातील श्रीविजया एअरलाइन्सच्या या विमानात एकूण ५६ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. विमान पश्चिम कालीमंतनची प्रांतीय राजधानी पोंटियानकच्या दिशेने जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅश झालेले बोईंग विमान २६ वर्ष जुने होते.

plane crash in Jakarta

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून सुटल्यानंतर एक विमान बेपत्ता झालं आहे. श्रीविजय एअर बोइंग ७३७ हे विमान असून या विमानात ५० हून अधिक प्रवासी असल्याची माहिती आहे. हे विमान पश्चिम कालिमॅटन प्रांतातून बोर्निओ बेटावरील पोंटियानककडे जात होते, अशी प्राथमिक माहिती आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, श्रीविजया एयर बोइंग ७३७ जकार्ताहून निघाल्यानंतर वेस्ट कलिमनतन प्रांतापासून संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान बेपत्ता झाले. बोईंग 737 विमानाने सोकार्नो-हट्टा विमानतळावरुन उड्डाण केले होते. फ्लाइट ट्रॅकर वेबसाइट फ्लाइट्रॅडार २४ च्या मिळालेल्या माहितीनुसार,  विमानाने एका मिनिटापेक्षा कमी वेळात १० हजार फूट उंची गाठली होती. उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातचं विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यामुळे विमान समुद्रात कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर्कातावरुन उड्डाण केल्यानंतर श्रीविजय एअरचे प्रवासी विमान अवघ्या चार मिनिटात १० हजार फूट उंचीपर्यंत पोहोचले होते. पण अवघ्या एका मिनिटात ते १० हजार फुटापेक्षा पण खाली आले आहे.

बचावकार्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की शहराच्या समुद्रात विमानाचे संशयास्पद अवषेश सापडले आहेत. स्थानिक तटरक्षक दलाच्या जहाजाच्या कमांडरने स्थानिक माध्यमांना सांगितले की, इंडोनेशियन किनाऱ्यावरील जावा समुद्रात विमानाचे काही अवषेश आणि काही मृतदेह आढळून आले आहेत. शोध आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. जकार्ताच्या उत्तरेकडील बेटांच्या शृंखलेतील थाउजंड आयलॅन्डवर विमानाचे अवशेषासारखे वाटणारे अशा वस्तू विखुरलेल्या दिसल्या असल्याचे या भागातील मच्छिमारांनी म्हटले आहे. विमान बेपत्ता झाल्याची बातमी पसरताच या विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी जकार्ता आणि पोंटियानकक विमानतळावर गर्दी केली आहे. अनेक बेटांचा समूह असलेल्या इंडोनेशियाची लोकसंख्या २६ कोटी आहे. रस्ते, हवाई मार्ग आणि सागरी प्रवासी मार्गावर असलेला अतिरिक्‍त ताण आणि तुलनेने कमी पायाभूत सुविधा यामुळे इंडोनेशियातील हवाई आणि सागरी प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक असते. श्रीविजया एअर ही इंडोनेशियातील सर्वात स्वस्त दर असलेली विमान कंपनी आहे. इंडोनेशियात देशांतर्गत आणि परदेशातही या विमान कंपनीच्या कायम सेवा सुरू असतात. श्रीविजय एअरलाईन्सने सांगितलं की, या घटनेसंदर्भात सर्व माहिती गोळा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments