२४ जानेवारी रोजी वरुण धवन आणि नताशा दलाल पंजाबी पद्धतीने विवाह संपन्न झाला. वरुणच्या कुटूंबाकडून नताशासाठी वधूचा पोशाख आणि इतर आवश्यक वस्तू पाठवल्या गेल्या. वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली. वरुणचे वडील डेव्हिड धवन, भाऊ रोहित आणि वहिनी जान्हवी हे २० जानेवारी रोजी डिझायनर मनीष मल्होत्राच्या स्टोअर बाहेर दिसले होते. याचा अर्थ मनीष मल्होत्राने नताशा आणि वरुणसाठी लग्नाचे कपडे डिझाइन केले आहेत. वरुण-नताशाचे लग्न गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये होणार होते, परंतु कोरोना आणि लॉकडाउनमुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले.
अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल हे शालेय जीवनापसून एकत्र वाढलेले आहेत. नताशा दलाल ही फॅशन डिझायनर आहे. हे दोघे २४ जानेवारी रोजी अलिबागच्या ‘द मॅन्शन हाऊस’ या भव्य रिसॉर्टमध्ये विवाहबंधनात अडकले. वरुण धवन आणि नताशा दलाल हे आपल्या कुटुंबियांसमवेत शुक्रवारी ‘द मॅन्शन हाऊस’ मध्ये पोहोचले. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता २३ जानेवारी रोजी आज हळद, मेहंदी, संगीत अशा वेगवेगळ्या विधी झाल्या. रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल, गार्डन एरिया, २५ खोल्या आणि इतर अनेक लक्झरी आणि आधुनिक सुविधा आहेत. रिसॉर्टशिवाय नताशाच्या लेहेंगाचे काही फोटोही समोर आले होते. वरुण आणि नताशाच्या लग्नासाठी ‘द मॅन्शन हाऊस’ला नववधूसारखे सजवले गेलेले. या रिसॉर्टचेही काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रिसॉर्टच्या बाहेरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अथांग समुद्रकिनारा लाभलेल्या या ठिकाणी एका आलिशान बीच रिसॉर्टमध्ये हा सेलिब्रिटी विवाहसोहळा पार पडला.
कोविडच्या पार्श्वभूमीमुळे अलिबागमध्ये होणा-या या लग्नसोहळ्यात मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. वरुण आणि नताशाच्या कुटूंबाव्यतिरिक्त काही जवळच्या मित्रांसह ५० लोक लग्नाला उपस्थित राहिली. रिपोर्ट्सनुसार सलमान खान, कतरिना कैफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट, करण जोहर, जॅकलिन फर्नांडिस, मनीष मल्होत्रा, श्रद्धा कपूर असे अनेक स्टार्स या लग्नात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. कोरोना विषाणूचा संसर्ग अद्यापही संपला नसल्यामुळं त्या धर्तीवर या विवाहसोहळ्यातही काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करण्यात आल्याचं दिसत आहे. आपल्या जीवनातील या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर लीक होऊ नयेत यासाठी नताशानं विवाहस्थळी मोबाईल वापरास बंदीचा आग्रह धरल्याचं कळत आहे. लग्नाला मोबाईल वापराबाबचे निर्बंध होते. विवाहस्थळ म्हणून निवड करण्यात आलेल्या रिस़ॉर्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या दिवसांत मोबाईल वापरता येणार नाही असे आधीच स्पष्ट करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे, वरुण आणि नताशा दलाल यांच्या विवाहसोहळ्यासाठी येणाऱ्या कुटुंबीय आणि पाहुणे मंडळींना कोविड चाचणी करुनच या ठिकाणी प्रवेश देण्यात आला. सर्वांनीच आपल्या कोविड १९ चाचणीचे अहवाल वेडिंग प्लॅनर्सना देणं अपेक्षित होते. याशिवाय इथं मास्क आणि सॅनिटायझरची उपलब्धता असेल याचीही काळजी घेण्यात आलेली.