बॉलिवूड अभिनेता सलमान खानला साप चावला आहे. पनवेल येथील फार्महाऊसवर शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री सलमान खानला साप चावला. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानला बिनविषारी साप चावला आहे.
सध्या सलमान खानची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सलमान खान त्याच्या फार्महाऊसवर आहे. या बातमीनंतर सलमान खानचे चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.