HomeMaharashtra Newsठाकरे बंधूच्या जाहीरनाम्या मुंबईकरांवर घोषणांचा वर्षाव

ठाकरे बंधूच्या जाहीरनाम्या मुंबईकरांवर घोषणांचा वर्षाव

ठाकरे बंधू एकत्र आले असून शिवसेना-मनसेकडून एकत्रितपणे निवडणूक लढवली जात आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक दोन्ही -ठाकरेबंधूंसाठी प्रतिष्ठेची बनली असून या महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठीचा मिनी जाहीरनामा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन बंधूंनी शुक्रवारी एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादर केला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून यश देणाऱ्या लाडकी बहिण योजनेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंच्या युतीची सत्ता आल्यास. मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलांना महिना १५०० रूपये देणाऱ्या स्वावलंबी महिला योजनेसह ७०० स्क्वे.फुट पर्यतच्य घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असून शिवसेना-मनसेकडून एकत्रितपणे निवडणूक लढवली जात आहे. त्याच पार्श्वभूम ीवर ठाकरे बंधूकडून मुंबईसाठी जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी घोषणांच्या उंचच उंच इमारती उभारल्या आहेत.

शिवसेना-मनसेचा जाहीरनामा जाहीर करण्यासाठी अमित ठाकरे दादरमघील शिवसेना भवनमध्ये आले होते, येथे दोन्ही बंधूंनी युतीचा जाहीरनामा जाहीर करताना मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये, लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईकरांचा स्वाभिमान म्हणत घरकाम करणाऱ्या महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी देणार आहोत. आम्ही यांच्यासारखं निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना सुरु करत नाहीये. आपली सत्ता आल्यावर आपण हे करू, कोळी महिलांसाठी सुद्धा हे आपण करणार आहोत. कोळी महिलांसाठी माँ साहेब किचनमधून १० रुपयात जेवण दिले जाणार आहे. यावेळी आदीत्य ठाकरेंसह राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

अमित ठाकरे काय म्हणाल ? – तुम्ही नगरसेवकं झाला म्हणजे मी नगरसेवक झालो, आदित्य तर आमदार आहे, अशी साद अमित ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना घातली. नाशिकमध्ये तपोवनात त्यांचा मंत्री म्हणतो झाड कापवेच लागणार, एवढा माज आहे. आपल्याला हा माज उतरवायचा आहे, घमंड तोडायचा आहे. आपण, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाळणाघर सुरु करणार आहोत. सगळ्या लहान मुलांची काळजी याम ध्ये घेतली जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शौचालय आपण सुरु करणार आहोत. याशिवाय, मुंबईत आणखी एक कॅन्सर रुग्णालय सुरु करायचं आहे. अरली डिटेक्शन ज्याने होईल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे रुग्णलाय सुरु करायचं आहे. कारण, मला माहितीये सुरुवातीला यामध्ये आहे किती त्रास होतो.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments