30 C
Mumbai
Friday, May 17, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeLifestyleजेनेटिकल मदर

जेनेटिकल मदर

हल्लीच्या घड्याळावर धावणाऱ्या जीवनशैलीमुळे, लग्न उशिरा झाल्यामुळे किंवा कपल्सना एकमेकांसोबत क्वालिटी टाइम न मिळाल्यामुळे, अशा एक ना अनेक कारणांमुळे मुल होण्यास उशीर होतो किंवा वय वाढल्याने शरीरामध्ये काही कमतरता निर्माण होतात, काही आजार शरीरामध्ये आपले बस्तान बसवतात. स्त्रीला मातृत्व प्राप्त झाल्याशिवाय एखादी स्त्री पूर्ण होत नाही, अशा बुरसटलेला समज आणि समाजसुद्धा आजही आपल्यामध्ये अस्तित्वाला आहे. मुल होत नाही म्हणून फक्त स्त्रीचं दोषी असे मानणार्यांची सुद्धा या जगात कमी नाही. परंतु, जिथे देवानेच हे विश्व निर्माण केल आहे तर, या विश्वातील अनेक शास्त्रांनी एवढी प्रगती केलेली दिसून येते कि, त्यापुढे कोणती गोष्ट अशक्य अशी उरलीच नाही.

आज आपण जेनेटिकल मदर बद्द्ल जाणून घेऊया. स्त्री बीजामध्ये असलेल्या काही समस्यांमुळे अपत्य प्राप्ती होण्यास अडथळा निर्माण होणाऱ्या महिलांची स्वत:चे मूल जन्माला घालण्याची इच्छा पूर्ण करतात त्या एग डोनेशन करणाऱ्या या महिला. ऐकून थोडं विचित्र वाटेल अथवा नवल सुद्धा वाटेल पण आजच्या काळात अशक्य असे काही नाही एवढी आपल्या विज्ञानाने  प्रगती केली आहे. अशा प्रकारे जन्म देणाऱ्या बाळाच्या आई जेनेटिकल मदर्स म्हणून ओळखल्या जातात. मुल न होणे या आणि अशा अनेक प्रकारच्या मानसिक, सामाजिक दबावांना बळी पडून वंध्यत्वाच्या समस्येला सामोरी जाणारी अनेक सुशिक्षित जोडपी मूल दत्तक घेण्याचा मार्ग न स्वीकारता, समाजाचा विचार करून आपलं मूल जन्माला घालण्यासाठी प्रयत्नची पराकाष्टा करायला लागतात. परंतु, ही एग डोनेशनची प्रक्रिया म्हणजे स्त्री बीजातील काही दोषांमुळे गर्भ तयार होणाऱ्या अडचणींवर विज्ञानाने दिलेला एक तोडगाचं आहे आणि हल्ली सर्रास या सुविधेचा लाभ घेताना दिसतात. ज्या महिलांच्या गर्भातील बीजामध्ये काही दोष निर्माण होतात, त्यांच्यासाठी तर ही प्रक्रिया वरदान ठरली आहे.

genetic mother in 2021

याची नक्की प्रक्रिया काय आणि कशी असते त्याबद्दल काही जणांच्या मनात संभ्रम अवस्था असते. कोण करू शकत एग डोनेशन आणि कोण त्याचा स्वीकार करून शकत. परदेशामध्ये अशा प्रकारच्या बँक तयार केलेल्या असतात. स्त्री आणि पुरुष दोघांच्याही. यामध्ये आई होण्याची क्षमता असणाऱ्या, पण आर्थिक परिस्थिती हालाखीची असणाऱ्या अशा अनेक महिला आज कायदेशीर पद्धतीने एग डोनेट करतात. विविध प्रकारच्या शारीरिक, जननक्षमतेची आणि अन्य महत्त्वाच्या तपासण्या करून आयव्हीएफ सेंटर्समार्फत एग डोनेट करू इच्छिणाऱ्या महिलांची सर्व चाचणी पार पडल्यानंतर निवड केली जाते. या महिला कधी एजंटच्या माध्यमातून तर कधी स्वत: या महिला वंध्यत्वावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांमार्फत एग डोनेशनसाठी संपर्क करतात. अशा ठिकाणी अशा अनेक महिलानी नोंद केलेली असते, ज्यांना आपत्य प्राप्तीसाठी दुसऱ्या महिलेच्या बीजाची आवश्यकता असते. एग डोनेशन करणाऱ्या महिलांवर सुद्धा विशेष नियमावली देण्यात आलेली असते. कोणीही उठसूट येऊन हे करू शकत नाही. महिलेची ओळख आणि सर्व माहिती गोपनीय ठेवण्याच्या नियमामुळे, बीज देणारी आणि घेणारी महिला जरी शेजारी बसल्या असल्या तरी एकमेकींना ओळखु शकत नाहीत.

कायद्याने मान्यता असलेल्या या व्यवसायाला अनेक नियम आणि अटी शर्थी दिल्या आहेत. एग डोनेट करणारी महिला विवाहित असावी हा मुख्य नियम आहे, या गोष्टीला तिच्या पतीची संमती असणे गरजेचे आहे, तिला स्वत:चे एक तरी मूल असावे, तिचं वय काय असावं वगैरे असे अनेक नियम आहेत. कायद्याने कितीही कठोर नियम केले असले तरी, अनेक अविवाहित मुलीही एजंटमार्फत या व्यवसायामध्ये सामील झालेल्या दिसतात. गरज फक्त एकच असते, ती म्हणजे आर्थिक चणचण. तुम्हाला मातृत्वासाठी चांगल्या प्रतीचं बीज हवं आहे आणि त्यांना त्या बदल्यात आर्थिक सहाय्य, इतका साधा, सरळ हिशोब असतो ! घरातल्या गरिबीमुळे, कमावणारे फक्त वडील, कॉलेजची फी भरायला पैसे नाहीत, घरात चार लहान भावंडं आहेत, वडील नाहीत अन् आईच्या कमाईत घर चालवण परवडत नाही अशी एजंटमार्फत येणाऱ्या अविवाहित मुलींची अनेक कारणं असतात. बीज स्वीकारणाऱ्या महिलेसाठी जरी हा स्वत:चं मुल मिळावे असा एक इच्छापूर्तीचा मार्ग असला, तरी बीज डोनेट करणाऱ्या महिलेसाठी निव्वळ तो एक प्रकारचा आर्थिक व्यवहार असतो. त्यामुळेच जात, धर्म, रंग, रूप, शिक्षण पासून ते कौटुंबिक पार्श्वभूमी पर्यंत अनेक गोष्टींनुसार या बीजाची किंमत ठरवली जाते. त्याचे मुल्यांकन अगदी २५ हजारांपासून ते ७५ हजारां पर्यंत किंवा काही वेळा त्याहीपेक्षा जास्त दर ठरू असतो आणि गरज असणारे तितकी किंमत मोजायला तयारही होतात.

genetic mother with her daughter

सध्या भारतात जवळपास ८ ते १० टक्के गर्भधारणा या माध्यमातून होत असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञनी सांगितले आहे. गर्भधारणेमध्ये कितीही अडचणी येत असल्या, तरी अनेक जोडप्यांना आपलंच हाडा-मासाच मूल हवं असतं आणि त्यासाठी सुद्धा सरोगसी हा एक पर्याय उपलबद्ध आहे. सरोगसी म्हणजे सिनेमामध्ये दाखवतात त्याप्रमाणे गर्भाशय भाड्याने देणारी महिला. तिला बाळाची बायोलॉजिकल आई असे म्हणू शकतो. तिच्या पोटात वाढणारा गर्भ तिच्या बीजापासून तयार झालेला असेलच असे नाही. परंतु एग डोनेशन प्रक्रियेमध्ये ज्या जोडप्याला मूल हवं आहे, त्यातील महिला बायोलॉजिकल आई बनते, कारण ती फक्त शरीरामध्ये तो गर्भ वाढवण्याचे काम करत असते. इथे एग डोनेट करणारी महिला ठरते जेनेटिकल आई, कारण तिच्या बीजापासून हा गर्भ निर्माण झालेला असतो. दोन महिला एकमेकींच्या गरजा पूर्ण करणाऱ्या असतात, यातील एक बायोलॉजिकल आई, तर दुसरी जेनेटिकल आई ! दोन्ही बाजूच्या गरजा लक्षात घेऊन केलेला हा एक प्रकारचा शुद्ध व्यवहार असला, तरी एखाद्याच्या कुटुंबात या जेनेटिकल मदर मुळे आनंदाची पेरणी होते. दुसऱ्या एखाद्या महिलेला मातृत्व प्रदान करण्याचा आनंद देणाऱ्या या जेनेटिकल मदर्सची जागा कोणत्याही आईपेक्षा नक्कीच कमी नाही. शेवटी आई ती आईच. मग ती जन्म देणारी असो अथवा प्रेमाने पालन पोषण करणारी.

- Advertisment -

Most Popular