34 C
Mumbai
Thursday, May 16, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeInternational Newsचीनचे मंगळावर पाउल

चीनचे मंगळावर पाउल

चीनमधून मागील वर्षीपासून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अख्या जगामध्ये हाहाकार माजवला आहे. सगळ जग अजून कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करताना दिसत असून, चीन मध्ये पुन्हा सर्व रुळावर येऊन सर्व व्यवस्थापन सुरळीत झाले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चीनने अंतराळ मोहिमेमध्ये नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे. चीनला मंगळावर यशस्वीपणे आपले अवकाशयान उतरवण्यास यश आले आहे. चीनच्या या अवकाशयानाचे नाव ताईन्वेन-१ हे असून, चीन हा मंगळ ग्रहावर यशस्वीरीत्या अवकाशयान उतरवणारा दुसरा देश ठरला आहे. चीननं मंगळावर पाठवलेलं पहिलं अवकाशयानं हे पूर्णत: मानवविरहीत असून, ताईन्वेन हे अवकाशयान चीनच्या अंतराळ संशोधन केंद्रातून रवाना करण्यात आले आहे. चीनमधील एका वृत्तसंस्थानं याबाबत वृत्त शेअर केलं आहे. मंगळ ग्रहावरील चीनचं हे पहिलंचं पाऊल आहे. मंगळावर ताईन्वेन-१ हे अवकाशयान ज्या ठिकाणी उतरले आहे त्या ठिकाणाला युटोपिया प्लॅन्शिया असे नाव आहे.

सौर ऊर्जेवर चालणारा रोव्हर झुरोंग ताईन्वेन-१ अवकाशयानातून अंतराळामध्ये पाठवण्यात आला आहे. मंगळावर उतरलेल्या ठिकाणाचं झुरोंग हा रोव्हर निरीक्षण आणि सर्वेक्षण करून त्याबद्दल मिळणारी सखोल माहिती चीनच्या अवकाश संशोधन केंद्राकडे पाठवेल. तसेच या रोव्हरवर स्वच्छ फोटो संकलन करता यावे यासाठी टोपोग्राफी कॅमेरा बसवण्यात आला आहे. रोव्हर मंगळ ग्रहावरील माती आणि वातावरणाचा अभ्यास करेल. याशिवाय मंगळ ग्रहावरील प्राचीन जीवन, पाणी आणि बर्फ याबाबतही अभ्यास केला जाणार आहे. चिनी बेट हैनान येथून ताईन्वेन हे पाच टन वजन असलेलं अवकाशयानं गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्रक्षेपित करण्यात आलेले. फेब्रुवारी दरम्यान सहा महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर अवकाशयानाची मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करायला सुरुवात झाली होती. जर झुरोगं रोव्हर यशस्वी कार्य करण्यास सफल झाला तर चीन हा देश पहिल्याचं मंगळ मोहिमेत यशस्वी ठरणारा ठरेल.

चीनच्या मानवविरहित झुरोंग रोव्हर अवकाशयानाने अंतराळ प्रवासंध्ये सात महिन्याचा काळ व्यतित करून, तीन महिने मंगळ ग्रहाच्या कक्षेत भ्रमंती केल्यानंतर मंगळाच्या पृष्टभागावर पाय ठेवण्याची शेवटची काही मिनिटे खूपच चिंताजनक होती. परंतु, शेवटच्या कठीण मिनिटामध्ये यशस्वीरीत्या मंगळावर अखेर अवकाशयान उतरले. चायना नॅशनल स्पेस अॅडमिनीस्ट्रेशन सेंटरने शनिवारी सकाळी झुरोंग रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरल्याचे सोशल मिडीयावर जाहीर केले. चीनचे मंगळ ग्रहावर उतरलेले झुरोंग हे पहिले रोव्हर असल्याचे सीएनएसएने म्हटले आहे. साधारणत: ताईन्वेन-१ ने १० फेब्रुवारीच्या दरम्यान मंगळ ग्रहाच्या कक्षेमध्ये प्रवेश केला होता. मंगळाबदलची संपूर्ण आणि दुर्मिळ माहिती या अवकाश मोहिमेमुळे मिळू शकलीच, पण आता झुरोंगचे मंगळाच्या पृष्ठभागावर पाउल पडल्याने तेथील जमीन, माती, दगड, बर्फ यांच्या बद्दलची सखोल माहिती मिळू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसे या अवकाशयानाचे नाव कवितेवरून ठेवण्यात आले तसे, या रोव्हरचे नाव देवाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. झुरोंग हे एका चीनी अग्नी देवतेचे नाव असून, मंगळ हा लाल ग्रहसुद्धा अग्नी ग्रहाचेच प्रतिक आहे. २०१४ सालामध्ये भारताने सोडलेले मंगळयान मंगळ कक्षेत आजही स्थिर असून मंगळ ग्रहाची इत्यंभूत माहिती आजही इस्रोकडे पाठविण्यास कार्यक्षम आहे. जरी जगभरामध्ये कोरोनाचे संकट घोंगावत असले तरी चीनने मंगळ अवकाशवारी मध्ये यशस्वी पाउल रोवले आहे.

- Advertisment -

Most Popular