आत्ताच युग हे तंत्रविज्ञान युग आहे. प्रत्येक क्षणाला नवनवीन बदल होत आहेत. प्रगती साधण्यासाठी, अपडेट राहण्यासाठी जगात घडणाऱ्या घडामोडींशी कनेक्ट राखण्यासाठी या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण गरजेच आहे. इंग्रजी ही जरी जगात सर्वत्र वापरली जाणारी भाषा असली तरी ती सर्व सामान्य लोकांना कठीणच वाटते. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत विश्वातील नवीन घडामोडी आपल्या मातृभाषेत, आपल्या मराठीत !
तुमच्या सर्वांच स्वागत आहे marathinews.com मध्ये, जी महाराष्ट्रातील सर्वांची लाडकी वेबसाइट आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील चालू घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. मराठीन्यूज वेबसाईटद्वारे तुमच्यापर्यंत सर्व नवीन बातम्या अगदी सोप्या शब्दांद्वारे पोहोचवणे यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहतो. या वेबसाइटद्वारे जगामध्ये घडणार्या सर्व घडामोडी अगदी एका क्लिकद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आपल्या या मराठीन्यूज वेबसाइटमध्ये मोजकेच पण सर्वांना पाहिजे असणारे सात सेक्शन आहेत. महाराष्ट्र, भारत, आंतरराष्ट्रीय, मनोरंजन, क्रीडा, टेकन्यूज आणि लाईफ्स्टाईल असे सात भाग तुम्हाला आपल्या वेबसाइटमध्ये पाहायला मिळतील. आमच्याकडे अर्थातच मराठीन्यूज कडे खूप चांगली टिम आहे जीने तुमच्यापर्यंत दरदिवशी क्वालिटी कंटेंट पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे जेणेकरून आपल्याला वेबसाइट पाहताना तुम्हाला चांगला सुखद अनुभव येईल.
तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून आभार आपल्या या मराठीन्यूज वेबसाइटवर भेट दिल्याबद्दल !