27.9 C
Mumbai
Tuesday, June 25, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeTech Newsव्हॉट्सअ‍ॅपचे ट्रॅकिंग फिचर

व्हॉट्सअ‍ॅपचे ट्रॅकिंग फिचर

भारतामध्ये सोशल मिडियावर जास्त वेळ घालवणारे अनेक मेम्बर्स आपल्याला रोजच्या जीवनात भायला मिळतात. आणि सध्या कोरोनामुळे असणारे लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम मुळे बराचसा प्रवासातला वेळ वाचल्याने सोशल मिडीयावर कायम सक्रीय असणारी मंडळी सुद्धा या विश्वात आहेत. भारतामध्ये फेसबुक, इंस्टा, टेलिग्राम, युट्यूब आणि बहुतांश भारतीयांच्या मोबाईलमध्ये कायम सुरु असेलेलं मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आज ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांच्या मोबाईल मध्ये हे अ‍ॅप असतेच. दिवसातील बराचसा काळ या अ‍ॅपवर घालवून सुद्धा अनेकांना यातील नवीन अथवा अगदी जुन्या पण उपयुक्त काही फीचर्सबद्दल माहिती देखील नसते.

आज आपण अशाच एका फीचरबद्दल माहिती बघणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हाला कोणीही कुठे हरवलात तर शोधू शकत किंवा तुम्ही कोणताही नवीन पत्ताचा सहजपणे शोध घेऊ शकता. नवनवीन फीचरचा वापर आधी मित्र परिवार आणि कुटुंबातील सदस्यांसोबत करून पहा. या नवीन फीचरचा वापर सुरक्षेच्या कारणासाठी देखील होऊ शकतो. या फीचरचा नक्की आपण कसा वापर करू शकतो, हे पाहूया थोडक्यात.

whatsapp tracking feature

सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. त्यानंतर चॅट पर्यायावर क्लिक करा, प्रथम तुम्हाला ज्या व्यक्तीला आपले लोकेशन पाठवयाचे आहे, त्याचे नाव यादीतून सिलेक्ट करून घ्या, व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये खाली + किंवा युपीन आयकॉन दिसेल,  त्यावर क्लिक करून येथे तुम्हाला लोकेशन निवडण्याचा पर्याय समोर दिलेला असेल, तेथे तुम्हाला Send Your Current Location आणि Share Live Location असे दोन पर्याय उपलब्ध असतील. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दोहोपैकी एक पर्याय निवडून सेंड करू शकता. जर तुम्ही एखाद्याला तुमचे Current location पाठवले तर त्याक्षणी तुम्ही ज्या ठिकाणी असाल  तेथील लोकेशन समोरच्या व्यक्तीला सेंड होईल. जर तुम्ही Live location समोरच्या बरोबर शेअर केले तर तुमच्या होणार्या हालचालींसोबत तुमच लोकेशनसुद्धा बदलत राहील.

लाइव्ह लोकेशनवर क्लिक केल्यानंतर हे लोकेशन तुम्हाला १५ मिनिटे १ तास किंवा ८ तासांसाठी सेट करायचे आहे याचा पर्याय उपलब्ध करून देत. नकळतपणे तुम्हाला कोणीतरी फॉलो करू शकत आणि जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला लाइव्ह लोकेशन सेंड केले तर तुम्ही त्या व्यक्तीला आणि त्यांच्या होणार्या हालचालींना ट्रॅक करू शकता. कोणता पर्याय निवडायचा हे तुमच्या सोयीनुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता. जर काही कालवधी नंतर तुम्हाला लाइव्ह लोकेशन शेअरिंग बंद करायचे असेल तर लाइव्ह लोकेशन ऑप्शन वर क्लिक करून लोकेशन शेअरिंग स्टॉप बटण प्रेस करावे. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला तुमच्या अपडेट्स मिळणे बंद होईल. कधी कधी अडचणीच्या प्रसंगी या पर्यायाचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो. फक्त अशा गरजेच्या पर्यायांची माहिती असणे गरजेचे आहे.

- Advertisment -

Most Popular