32 C
Mumbai
Friday, May 24, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeLifestyleदीर्घ श्वसन एक वरदान

दीर्घ श्वसन एक वरदान

सध्याचा काळ असा बनला आहे कि, जेवढ आपण निरोगी राहू तेवढ चांगले. त्यासाठी दिवसातील १५ मिनिट्स तरी मेडीटेशनला द्यावीत.

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वत: साठी किती वेळ काढतो..! शेवटी म्हणतात ना कि जान हे तो जहान हे. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेणे गरजेचे आहे. त्यामुळे दिवसातील काही वेळ हा स्वतसाठी बाजूलाच काढून ठेवायचा, आपला हक्काचा वेळ. पण कशासाठी काढायचा हा वेळ. स्वताच्या मनाला आवडेल त्या गोष्टी करण्यासाठी. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर, ज्या गोष्टीमुळे तुमच मन प्रफुल्लीत होत असेल, वाचन, योग, गाणी ऐकणे, डान्स करणे, इत्यादी एक ना अनेक गोष्टी रोज आवर्जुन करण्यासारख्या असतात.

सध्याचा काळ असा बनला आहे कि, जेवढ आपण निरोगी राहू तेवढ चांगले. त्यासाठी दिवसातील १५ मिनिट्स तरी मेडीटेशनला द्यावीत. रोज काही वेळ दीर्घ श्वसन केल्याने आरोग्यावर एवढा सकारात्मक बदल घडतो कि दुसऱ्या दिवशी त्या वेळेला मेडीटेशन करण्याचा उत्साह जाणवतो. मन शांत झाल्याने जीवनशैलीमध्ये खूपचं सुधारणा जाणवते. एखाद्या गोष्टीचे नको तेवढी तुम्ही चिंता करत असता, तेव्हा तुमचे हृदय दुप्पट वेगाने धडधड करायला लागते. हृदय व मेंदूकडे होणारा रक्तप्रवाह अधिक प्रमाणात वाढू लागतो. हे सर्व टाळण्यासाठी दीर्घ श्वसनचा रोज सराव करणे गरजेचे आहे. मग भलेही किती तणावाचा डोंगर तुमच्या डोक्यावर असो. हा प्रयोग केल्याने २४ ते ४९ तासांमध्येच मन व शरीराला आराम मिळून झोपही वेळेवर आणि चांगली येते. आणि सध्या आवश्यक असेलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती,त्यामध्ये लक्षणीय सुधारणा जाणवते.

importance of deep breathing

श्वसन करण्याचे पण काही प्रकार दिले गेलेले आहेत, सावकाश, सखोल व दीर्घ श्वसन केल्याने शरीर एक प्रकारे स्वच्छ होण्यासोबत मन शांत करण्यास मदत करते. निद्रानाशाची समस्या जाणवत असेल तर झोपण्यापूर्वी दीर्घ श्वसन करा, गाढ झोप लागते. दीर्घ श्वसनामुळे ताजा ऑक्सिजन फुफुसाम्ध्ये घेतला जाऊन, विषारी पदार्थ व कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडला जातो. श्वासातून बाहेर येणारा कार्बन डायऑक्साइड नैसर्गिक आहे. छोट्या श्वासांमुळे फुप्फुसांची क्रीया मंदावते, ते कमी प्रमाणात प्रतिक्रिया देतात. इतर अवयवांना हा अनावश्यक कचरा बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. रक्त ऑक्सिजनेटेड झाल्यामुळे शरीराची कार्यक्षमता मजबूत बनते. शरीराचे सर्व महत्त्वाचे अवयव नीट कार्य करायला सुरुवात करतात. निरोगी रक्तपुरवठ्याने संसर्ग पसरवणारे जंतू समुळ नष्ट होण्यास मदत होते. दीर्घ श्वसनाने शरीरात गुड हार्मोन तयार होते आहे आणि दीर्घ श्वसनाने चिंताजनक विचार आणि वाटणाऱ्या भीतीपासून शांतता मिळते.

LifeStyle

पहिल्यांदाच साडी नेसण्याच्या 5 सोप्या टिप्स | महिलांसाठी

चालायला आणि बसायला त्रास होणार नाही, पूर्ण माहितीसाठी click here

how to wear saree in marathi and pro tips

- Advertisment -

Most Popular