26 C
Mumbai
Friday, July 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeFinanceबजाज-पे नवे पेमेंट अँप

बजाज-पे नवे पेमेंट अँप

कोरोनामुळे सध्या वर्क फ्रॉम होम सुरु असले तरी, बऱ्याच जणांचे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे जरी जिन्नस खरेदी करायचा असेल तरी तो ऑनलाइन खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवसायाला त्यामुळे तेजी आली आहे. देवाणघेवाण करताना व्हायरसचा प्रसार होऊ शकतो म्हणून आता बहुतेक जण डिजिटल पेमेंटच करतात. केंद्र सरकारनेही डिजिटल पेमेन्टला प्रोत्साहन दिले आहे. डिजिटल पेमेंट क्षेत्रात विविध कंपन्या उतरल्या आहेत. त्यामध्ये पेटीएम, अमेझॉन, जी-पे, फोन-पे, अशा अनेक महत्वाच्या कंपन्याचा वापर कायम केला जातो. मात्र, बाजारामध्ये आता या सर्वाना टक्कर देण्यासाठी नवे डिजिटल पेमेंट अँप एन्ट्री करत आहे.

आता इतर ऑनलाईन पेमेंट कंपन्यांप्रमाणे बजाज फायनान्सनेही डिजिटल पेमेंट उद्योगाकडे वळला असून बजाज फायनान्सला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडूनही परवानगी मिळालेली आहे. कंपनी लवकरच गुगल-पे, पेटीएम आणि अॅमेझॉन पे यांसारखे काम करणारे बजाज-पे  बाजारात आणणार आहे. आरबीआयची बजाज फायनान्सला मान्यता स्थायी स्वरूपातील असल्याने यापूर्वी कंपनीला दरवर्षी आरबीआयची परवानगी घेण्याची गरज होती; पण आता तशी आवश्यकता नसेल.

NBFC ने बजाज फायनान्स’चा डिजिटल वॉलेट ग्राहक हा त्याच्या डिजिटल फायनान्स ऑफरिंगचा विस्तार करण्याच्या मोठ्या योजनेचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. कंपनी वेगवेगळ्या टप्प्यात डिजिटल पेमेंट्स मार्केटमध्ये विस्तार करण्यासाठी बजाज पे आणत आहे. कंपनीच्या तिमाही सादरीकरणानुसार, जानेवारीमध्ये भारत बिल-पे सिस्टीम ही बजाज पे वर लाईव्ह दाखवण्यात आलेली होती. अशाच प्रकारचा एक संपूर्ण यूपीआय कार्यात्मक पेमेंट पर्याय मे मध्ये उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीपीआयच्या सहाय्याने निधी हस्तांतरण करणे तसेच आर्थिक कामेदेखील या माध्यमातून केली जाऊ शकतात. त्याची मर्यादा आपल्या रक्कम उपकरणामधील मूल्या इतकीच असणार आहे. प्रीपेड पेमेंट इंस्त्रुमेंट हे एक प्रकारचे पेमेंट वॉलेट असून याशिवाय ते मॅग्नेटिक चिप, व्हाऊचर, स्मार्ट कार्ड, मोबाईल वॉलेटच्या रूपात सुद्धा उपलब्ध होऊ शकते. यामध्ये इतर कोणत्याही पीपीआयकडून क्रेडिट कार्ड, काश, डेबिट कार्ड हस्तांतरित करता येईल.

क्लोज्ड सिस्टम पीपीआय या पीपीआयमध्ये आपल्याला रोख रक्कम काढण्यास किंवा थर्ड पार्टीचा निधी हस्तांतरित करण्याची परवानगी मिळू शकत ​​नाही. आपण या प्रणालीचा वापर कोणत्याही एका व्यापार्‍यासाठी किंवा वस्तू आणि सेवांच्या रकमेसाठी करता येतो. तर सेमी क्लोज्ड सिस्टम पीपीआयच्या मदतीने आपल्याला  व्यापार्‍यांना पैसे देता येऊ शकतात. परंतु, यामध्ये रोख पैसे काढणे प्रतिबंधित केले आहे. 10,000 रुपयांपर्यंतच्या पीपीआयसाठी तुम्हाला केवायसीची आवश्यकता असेल. दुसरीकडे जर रक्कम 1,00,000 च्या वरती गेली तर आपल्याला केवायसीच्या सर्व फॉर्मेलिटीज पूर्ण करणे अनिर्वाय आहे.

- Advertisment -

Most Popular