युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या दापोली तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याने सध्या पर्यटकांना भुरळ घातली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून किल्ला पाहण्यासाठी देशभरातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. दिवसाला याचा थेट फायदा स्थानिक बोटिंग व्यवसायाला मिळत आहे. सध्या या हंगामात दररोज किमान २ ते २.५० लाख रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती येथील बोटचालकांनी दिली. सुवर्णदुर्ग हा दापोली तालुक्यातील एकमेव जलदुर्ग असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झाल्याने या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जागतिक पातळीवर पर्यटकांचा ओघ लक्षणीय वाढला अधोरेखित झाले आहे. त्यामुळेच आहे. ऑक्टोबर ते मे या कालावधीत हवामान अनुकूल असल्याने किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. विशेषतः शनिवार, रविवार व सुट्टयांच्या दिवशी गर्दी वाढते.
पावसाळ्यात मात्र समुद्र खवळलेला असल्याने बोटिंग पूर्णतः बंद ठेवण्यात येते. सध्या किल्ला सफारीसाठी सकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास हर्णे बंदरातून फायबर बोटी सुरू होतात. मुरुड व पाळंदे येथून केवळ डॉल्फिन सफर केली जाते. किल्ला सफरीसाठी एकूण ९ फायबर बोटी उपलब्ध असून गेल्या आठ दिवसांत एका बोटीच्या दररोज सरासरी ८ ते ९ फेऱ्या होत आहेत. एका फेरीत १२ प्रवासी, प्रत्येकी २०० रुपये दराने प्रवास करतात. त्यामुळे बोटचालकांना चांगले उत्पन्न मिळत आहे. कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने गाजलेला हा ऐतिहासिक जलदुर्ग पाहण्यासाठी पर्यटक रांगा लावत आहेत.
भुयारी मार्गासह मोठी तटबंदी – दरम्यान, या किल्ल्याची साफसफाई झाल्याने येथील ठिकाणे आता व्यवस्थित दृष्टिक्षेपात पडतात. याठिकाणी दोन भुयारी मार्ग, राजवाड्याचे अवशेष, तलाव, तोफ, गोदाम आदी ठिकाणे पाहण्यासारखी असून मोठी तटबंदी पाहून अचंबित व्हायला होते.
